नवरदेव चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला, अकोल्यात होणार प्रदर्शीत

अकोले प्रतिनिधी
शेतकरी बांधवांच्या जीवनावर आधारित असलेला नवरदेव चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नव्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे अगस्ती चित्र मंदिर अकोले येथे 9 जानेवारी 2025 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
जास्तीत जास्त लोकांनी अकोल्याच्या भूमीपुत्रांनी बनविलेल्या चित्रपटाला साथ द्यावी असे आवाहन अनेक स्थरांतून होत आहे. अकोल्या बरोबरच, नाशिक पुणे येथील कलाकारांनी चित्रपटात काम केले असून चार गाण्यांचा समावेश असलेला हा चित्रपट दोन तास वीस मिनिटांचा आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपटाशी संलग्न असलेल्या कोतुळेश्र्वर वार्ता चित्रपट निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पत्रकार निरंजन देशमुख यांनी केले आहे, महाराष्ट्राचे लाडके गायक श्री. सोनू साठे आणि रोहित पाटील यांनी चित्रपटात गाणे गायले आहे. चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चे सर्व काम पुणे येथील एम के स्टुडिओत झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे पत्रकार श्री निरंजन देविदास देशमुख यांनी साप्ताहिक कोतुळेश्वर वार्ता च्या दीपावली अंक प्रकाशनातून नवरदेव नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बारा वर्ष बारा वेळा दीपावली अंकाचे प्रकाशन करून त्या पैशातून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कोतुळेश्वर वार्ता साप्ताहिक आणि दीपावली अंक प्रकाशन 2018 साली त्यांनी पूर्णपणे बंद केले असून त्यानंतर सामाजिक प्रबोधनाकडे त्यांनी लक्ष दिले. शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित नवरदेव चित्रपट असून चार वर्ष त्यांनी या चित्रपटाची निर्मिती साठी लागले आहेत.
9जानेवारी 2025 रोजी अकोले येथील अगस्ती चित्र मंदिर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे पुरेशा आर्थिक पाठबळा अभावी एकाच वेळी सगळीकडे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही तर टप्प्याटप्प्याने प्रत्येक थेटरला चित्रपट प्रदर्शित करण्याचा संकल्प त्यांचा आहे. . एका पत्रकाराने धाडस करून निर्माण केलेला हा चित्रपट निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे.नजास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहचावा आणि त्यातून चांगला संदेश समाजात जावा हा त्यामागील निरपेक्ष हेतू आहे.
अतिशय संघर्षातून सामान्य कुटुंबातील तरुणाने जिद्दीने तळमळीने हा चित्रपट पूर्ण केला आहे. चित्रपटाची कथा स्वतः त्यांनी लिहिली आहे, गाणी सुद्धा त्यांनीच लिहिली आहेत, आणि चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी स्वतःच केले आहे.
चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चे काम पुणे येथे एम के स्टुडिओत केले गेले आहे. “एकच साद आमची तुम्हाला, द्या खंबीर साथ ,मराठी चित्रपटाला”हे ब्रीद वाक्य त्यांनी तयार केले असुन शेतकऱ्यांच्या या चित्रपटाला निश्चितच प्रेक्षक वर्ग साथ देऊन नवरदेवाला आशीर्वाद देतील असा आत्मविश्वास श्री निरंजन देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
—-////—–