वाघुंडे बुद्रूक हद्दीतील अलंकार कला केंद्र तात्काळ बंद करा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
वाघुंडे बुद्रूक हद्दीतील अलंकार कला केंद्र तात्काळ बंद करा,अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा- मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला आहे
वाघुंडे बुद्रूक हद्दीत असलेले कला केंद्र बंद करण्याबाबत गेल्या ६ महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी पुराव्यानिशी पाठपुरावा केला आहे.
या शेजारील ४,५ गावातील जमिनी एमआयडीसी मधे गेल्या आहे. येथिल काही तरुण वाम मार्गाला लागले आहेत. त्यामुळे हे अलंकार कलाकेंद्र तात्काळ बंद करावे. हे कलाकेंद्र चालू करण्यासाठी कुठलाही ग्रामसभेचा ठराव घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी निवेदन दिले. त्यानंतर स्मरण पत्र जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांना निवेदन दिले पण अद्याप पर्यन्त कुठलीही कारवाई केली नाही.
जर या कलाकेंद्रावर कायदेशिर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला.