पारनेर साखर कारखाना अवसायकाचीआठ कोटींची उधळपट्टी! पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने दिला उपोषणाचा इशारा.

गैरव्यवहार व मनमानी मुळे बचाव समिती आक्रमक
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना अवसायकाच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने दिला आहे .
पारनेर कारखान्यावर गेल्या अठरा वर्षांपासून अवसायक नियुक्त आहे. या संस्थेवर अवसायक ठेवण्याची मुदत दि. १५ जून २०१५ रोजी संपुष्टात आलेली आहे . परंतु त्यानंतरही अवसायक यांनी या संस्थेवर आपला ताबा कायम ठेवलेला आहे . हा ताबा सोडण्यासाठी कारखाना बचाव समितीने अनेक वेळा शासन – प्रशानाकडे पत्रव्यवहार केलेले आहेत .अवसायनाचे कोणतेच काम न करता अवसायकाने कामकाजावर आजपर्यंत सुमारे आठ कोटी रुपयांची उधळपट्टी करून रुपया देखील वसुल केलेला नाही व कारखान्याचे अतोनात नुकसान केलेले आहे . विक्री करारानुसार सन १०१५ नंतर अवसायक यांची कोणतीच देणी देण्याची कोणतीच जबाबदारी नसताना ,
गेल्या आठ वर्षांचे कामकाजात त्यांनी कारखान्याच्या गोडाऊन मधील एक कोटी रुपयांचे साहित्य क्रांती शुगर यांना विनामोबदला दिले . साखर कारखान्याची जमीन विक्रीला काढली होती . कारखान्याच्या पंचवीस एकर जमिनीचे शुन्य रुपये मोबदल्यात बेकायदेशीर हस्तांतरण केले . कारखान्याला मिळालेल्या रकमेतुन काही कामगारांची देणी दिलेली आहेत . स्वतः च्या व कर्मचारी यांच्या पगारावर बेसुमार खर्च केला आहे .
कारखाना विक्रीनंतर अवसायक यांनी कारखान्याचे हित पाहण्याऐवजी खाजगी कंपनी क्रांती शुगर यांच्या फायद्याची अनेक कामे गेल्या आठ वर्षांत केलेली आहेत . तसा ठपका देखील लेखा परीक्षकांनी त्यांचेवर ठेवलेला आहे . त्यांच्या या गैरकारभारा विरोधात कारखाना बचाव पुनर्जीवन समितीने मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात को – वारंटो रिट याचिका दाखल केली आहे . खंडपीठाने या प्रकरणी अवसायक यांना नोटीस बजावून २८ नोव्हेंबर पर्यंत म्हणणे सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते . परंतु त्यानंतर चार तारखा उलटुनही त्यांनी आपले म्हणणे सादर केलेले नाही . त्यामुळे बचाव समितीने दाखल याची केलेल्या याचिकेच्या निकालाला विलंब होत असल्याचे समितीचे म्हणने आहे . येत्या २२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे . म्हणून २२ फेब्रुवारी पुर्वी त्यांनी आपले म्हणणे न्यायालयात सादर करावे अशी मागणी करण्यात आली आहे . २२ तारखेपर्यंत आपले म्हणणे सादर न केल्यास दिनांक २३ फेब्रुवारीपासून अहमदनगर येथील त्यांच्या कार्यालया बाहेर बचाव समितीने आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे .