सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा क्षेत्रासाठी पत्रकार परिषद संपन्न
डॉ. शाम जाधव
सांगली आज दिनांक १९/१०/२०२४ रोजी सेवक संघटित व संघटित आरोग्य कामगार संघटने कडून आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सांगली येथील हॉटेल आंबेसेटर मध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या पत्रकार परिषदेत संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय उमरफारुक ककमरी यांनी आपली भूमिका मांडली त्यावेळी ते म्हणाले सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते फक्त एक दुसऱ्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे व समाजाला दूर करण्याचे राजकारण चालू आहे या सर्वांमध्ये कुठेतरी कामगार हा दबवला जात आहे तसेच कामगाराची प्रत्येक ठिकाणी पिळवणूक होत आहे कामगार हा कुठल्या एका जाती समाजाचा नसून कामगार हीच एक वेगळी जात आहे जीवन दररोज उदरनिर्वासाठी आपले जीवन आणि आपले कामावर निर्भर असून त्याच्यावर होत असलेल्या अत्याचारावर कोणाचेही लक्ष असून ती पूर्ण दुर्लक्षित होत आहेत बहुतांश लोकांमध्ये कामगार म्हणजे फक्त बांधकाम मर्यादितच कामगार लक्षात येतात आणि सर्वांच्या डोक्यात फक्त कामगार म्हणून भांडी पेटी वाटप हेच कामगारांचे भल्याचं काम दिसून येत आहे.
कामगार वर्गामध्ये जो विशेष करून कामगार वर्ग आहे जो म्हणजे आरोग्य सेवक आरोग्य कामगारांची अवस्था तर सर्वाहून पलीकडून आहे कारण मिरज आरोग्य पंढरी नावलौकिक करणारे वाल्हे हॉस्पिटल ज्याला आपण मिशन हॉस्पिटल नावाने ओळखलं जातं ते हॉस्पिटल बंद पाडल्याचा राजकारण करण्यात आलं आणि ते एक बंद झाल्यानंतर तिथे जो आरोग्य कामगार आहे आमच्या बंधू-भगिनी जे आहेत ते बेरोजगार झाले त्यांचे उदरनिर्वाचे पश निर्माण झाले आणि विशेष करून खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सुद्धा अशीच दुर्गती आहे येथील काम करणारा जो वर्ग आहे खास करून मामा मावशी यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्षित करून तुटपूजा वेतनावर त्यांचा जीवन जगणे फार कठीण झालेला आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेतमजूर शेतामध्ये काम करणाऱ्या आमचे बंधू भगिनी यांची सुद्धा अशीच अवस्था आहे आणि कामगार मंत्र्यांना आमचा सवाल असा आहे की आपण कामगार मंत्री आहात नेमका कामगार कोण फक्त बांधकाम कामगार हाच मर्यादित असून त्यांच्यासाठी भांडी व पेटी वाटप करणं हा त्यांच्यासाठी कल्याणाचे काम आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही संघटने कडून कामगार हा मुद्दा धरून आमच्या असणाऱ्या सभासदांच्या जीवावर आम्ही येणारी विधानसभा निवडणूक ही लढवत आहोत त्यासाठी आमच्याकडे उमेदवार आमच्या कामगार संघटनेचे सभासद तथा पदाधिकारीच आहेत त्यामुळे कामगार हितात आम्ही काम करू आणि जो बांधकाम कामगारांमध्ये टक्केवारीचा जो षडयंत्र काम चालू आहे त्या टक्केवारीच्या कामाला सुद्धा हाणून पाडू आणि त्याचा जाळा सगळा विस्कळीत करू अशी गवाई दिली आणि त्याच वेळेला उमेदवार लावण्याची ठिकाण मिरज विधानसभा सांगली विधानसभा तसेच कवठेमंकाळ-तासगाव विधानसभा क्षेत्रात तीन उमेदवार लावण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली त्यावेळेस संघटनेचे पदाधिकारी माननीय जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे ,शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे, मिरज तालुकाध्यक्ष अमीर मुजावर, मिरज तालुका उपाध्यक्ष नंदकुमार गुरव,सचिन वाघमारे, सांगली जिल्हा संघटक मानतेश कांबळे, अबूबकर ककमरी, शाहरुख ककमरी, विनायक पाटील, अनिल पाटील,देविदास सावळे, स्वप्निल जाधव,कादरबशा बागवान,आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद संपन्न झाली