शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भायगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री. नवनाथ बाबा मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भायगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मनिषा राजेंद्र आढाव ह्या होत्या.यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतच्या विविध योजनांची माहिती युवा नेते राजेंद्र आढाव यांनी आपल्या भाषणातून ग्रामस्थांना माहिती दिली.यावेळी गावातील विधवा महिलांचा मानधन देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते राजेंद्र आढाव,उपसरपंच सौ. आशा लांडे,भायगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची माजी अध्यक्ष गणपत आढाव,एकनाथ लांडे, अनिल लांडे, पंढरीनाथ आढाव, विष्णू घाडगे, रमेश आढाव, सुभाष सौदागर, राजेंद्र सुरोशे, गोटीराम पवार, ग्रामविकास अधिकारी एस. जे.शेख, मोहन जगधने, आप्पासाहेब सौदागर, ज्ञानेश्वर गांगुर्डे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व भायगाव ग्रामपंचायत मार्फत यंदाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ.नर्मदा मोहन जगधने व सौ.वंदना राजेंद्र सुरोशे यांना देण्यात आला. स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व रोख रक्कम आशिया पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पुरस्कारार्थींचा त्यांचा सन्मान करण्यात आला.