वात्सल्य वृद्धाश्रम पंचवटी स्नेहल क्रीडा मंडळ तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
नाशिक येथे आज दिनांक २१/१०/२०२४ रोजी वात्सल्य वृद्धाश्रम पंचवटी या ठिकाणी मुंबई परळ येथील स्नेहल क्रीडा मंडळ तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. लोकगंगा हा कार्यक्रम या माध्यमातून घेण्यात आला. यातील सर्व कलाकारांनी दमदार नृत्य करत वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत आजी आजोबांचे मनोरंजन केल.

कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान वयोगटापासून तर मोठ्या वयोगटापर्यंत जवळपास ६० कलाकारांनी सादरीकरण करून आजी-आजोबांची मन जिंकली. त्याचप्रमाणे डीएचएल या कंपनीने देखील भेटवस्तू देऊन एक अनोखा उपक्रम वात्सल्य वृद्धाश्रमात राबविला DFL च्या सर्व कर्मचार्यांनी मिळून दिवाळीनिमित्त संपूर्ण आश्रमात साफसफाई झाडू पोछा करत स्वच्छतेचा संदेश देखील दिला. यावेळी मुंबईचे आयुर्वेदिक डॉक्टर विनायक तायडे, व त्यांचे सहकारी यांचे तर्फे सर्व आजी आजोबांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
स्नेहल क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी यावेळी आपल्या कलाकृतीतून आजी-आजोबांचं मनसोक्त असं मनोरंजन केलं. त्याचप्रमाणे हा सर्व सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी आजी आजोबांचे आशीर्वाद देखील घेतले या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची हजेरी देखील लागली. नाशिक मधील कारगिल योद्धा दीपचंद नायक, नगररचनाचे पवार सर, नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी, नगरसेवक शंकर हिरे, आयमा अंबडचे अध्यक्ष ललित बुब, प्रमोद वाघ, अक्षय फाउंडेशन च्या मोना दीदी,राधिका फाउंडेशनच्या चेतना सेवक,श्री व सौ अॅडव्होकेट शिनकर असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानंतर मान्यवरांनी आणि आयोजकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचा सुंदर असं सूत्रसंचालन स्नेहल क्रीडा मंडळाच्या वैष्णवी सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी वात्सल्य चा संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले. वात्सल्यचे अध्यक्ष सतीश सोनार, सौ सोनार, योगेश पिंपळगावकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला
