विद्यार्थ्यांनी बनवले भारतीय बनावटीचे आकाश कंदील

शिर्डी प्रतिनिधी :
(संजय महाजन)
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवले. आकाश कंदीला बरोबरच विद्यार्थ्यांनी प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांच्यासाठी वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची भेट कार्ड तयार करून प्राचार्यांना सुपूर्त केले.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाश कंदीलाचे परीक्षण प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर यांनी केले.
उपक्रमासाठी श्री. संजय पालवे, श्री. हरिभाऊ कुलकर्णी, श्री. विठ्ठल खेडकर, श्री. वैभव सूर्यवंशी, श्री. दत्तात्रय सुरवसे, श्री. शिवकुमार दहिफळे, श्री. रवींद्र माळी, श्री. श्रीकांत म्हसकर, श्रीमती वैशाली तारू, श्रीमती सुनिता बनकर आणि प्रशालेतील सेवक वर्ग यांनी सहकार्य केले.

सुंदर आकाश कंदील आणि भेट कार्ड यांची निर्मिती पाहून नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशालेचे कलाशिक्षक श्री. योगेश कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते आठवी मधील जवळ जवळ सहाशे विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ तसेच बाजारांमधील भारतीय बनावटीचे साहित्य घेऊन प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्त आकाश कंदीलाची निर्मिती केली.