आजचे पंचांग व राशिभविष्य दि २४/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०२ शके १९४६
दिनांक :- २४/१०/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २५:५९,
नक्षत्र :- पुष्य अहोरात्र,
योग :- साध्य समाप्ति २९:२२,
करण :- बालव समाप्ति १३:३३,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:४० ते ०३:०६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२७ ते ०७:५३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:४० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:४० ते ०३:०६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:३३ ते ०५:५९ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
कराष्टमी, कालाष्टमी, गुरुपुष्यामृत संपूर्ण दिवसभर,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०२ शके १९४६
दिनांक = २४/१०/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
त्रासदायक गोष्टींपासून दूर रहा. राग अनावर होऊ शकतो. मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा. दिवसाची सुरुवात दमदार होईल.
वृषभ
अनेक बाजूंनी लाभदायक दिवस. कष्टाचे फळ मिळेल. तुमचा आनंद द्विगुणित होईल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.
मिथुन
कामाचा भार वाढेल. त्यामुळे थकवा जाणवेल. कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.
कर्क
भाग्याची उत्तम साथ मिळेल. कमी नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईक मदतीला येतील. नवीन विचार जाणून घेता येतील.
सिंह
चिडचिड वाढू शकते. शांततेचे धोरण ठेवावे. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ जखम संभवते.
कन्या
जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. स्वभावात उधळेपणा येईल. वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. चोरांपासून सावध राहावे. उगाचच कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका.
तूळ
तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. चिडचिड करू नका.
वृश्चिक
स्त्रीवर्गापासून सावध राहावे. पायाचे त्रास जाणवतील. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांची उत्तम साथ मिळेल.
धनू
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. संतती सौख्य उत्तम लाभेल. हाताखालील लोकांशी नीट वागावे.
मकर
योजनेला मूर्त स्वरूप द्यावे. हातातील कामात चिकाटी ठेवा. आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्यांची सेवा कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.
कुंभ
घर आणि काम यांचा मेल घालावा. नातेवाईकांना नाराज करू नका. तुमच्यातील हुशारी दिसून येईल. कुटुंबात मन रमेल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात.
मीन
खर्चाला आवर घालावी. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे. ध्यानधारणा करावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर