इतर
अकोले कृषी उत्पन्न बाजर समितीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावे – ग्राहक पंचायत

अकोले (प्रतिनिधि) अकोले आदिवासी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबिनला हमीभाव मिळण्यासाठी अकोले कृषि उत्पन्न बाजार समितीने तातडीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राने लेखी पत्राद्वारे सभापती, सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती अकोले यांना केली आहे
निवेदनात महाराष्ट्र शासनाने सोयाबीनला ४८९२ रुपये हमीभाव ठरवून दिला असून जिल्ह्यामध्ये बऱ्याच कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये व तालुक्यामध्ये सोयाबीन, मुग, उडीद, इत्यादी शेतीमालासाठी शेती माल खरेदी केंद्र सुरु केले आहेत.
तसेच अकोले आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिपावलीसाठी व दैनंदिन गरजांसाठी पैशांची अत्यंत गरज असुन शेतीमाल खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे खाजगी व्यापारी वर्ग मनमानी भावाने शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी भावाने सोयाबीनची खरेदी करत असल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांची लुट करत असून पर्यायाने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबिनला हमीभाव मिळवण्यासाठी तातडीने कृषि उत्पन्न बाजार समितीने सोयाबिन खरेदी केंद्र सुरु करावे असे म्हटले आहे.
निवेदनावर ग्राहक पंचायत अकोले तालुक्यातील मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर , रमेश राक्षे, राम रूद्रे, भाऊसाहेब वाळुंज, शारदा शिंगाडे, मंगल मालुंजकर, वसंतराव बाळसराफ, भाऊसाहेब वाकचौरे, प्रकाश कोरडे, कैलास तळेकर,दत्तात्रय शेटे, नरेंद्र देशमुख, सखाहरी पांडे, रामदास पांडे, गणेश पोखरकर, जालिंदर बोडके, दत्ता ताजणे, आदिंची नावे आहेत. निवेदनाच्या प्रती माहितीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर बी. आर. पाटिल जिल्हा पणन अधिकारी अहिल्यानगर,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांना ई मेल व लेखी स्वरूपात पाठवल्या आहेत.