रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे २९ शिक्षकांचा सन्मान!

राष्ट्र बांधणीचे खरे शिल्पकार शिक्षकच – स्वामी श्रीकंठानंद
नाशिक: जन्माला आलेल्या प्रत्येक मुलावर ज्ञानरुपी संस्कार करण्याचे काम शिक्षक करताहेत. मुलांना घडविण्यापासून तर राष्ट्राच्या निर्मितीत खऱ्या अर्थानं योगदान देणारेदेखील शिक्षकच असतात. संस्कारक्षम आदर्श समाज घडविण्याचे अनमोल कार्य करतात. म्हणूनच राष्ट्र बांधणीचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असल्याचे प्रतिपादन श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील २९ शिक्षकांचा श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे उप प्रांतपाल स्वाती चव्हाण, डिस्ट्रिक्ट लिटरसी चेअर अनिल देशमुख, अध्यक्ष मंगेश अपशंकर, सचिव डॉ. गौरव सामनेरकर, हेमराज राजपूत, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख विक्रम बालाजीवाले, लिटरसी संचालक उर्मी दिनानी उपस्थित होते.
रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे – गणेश महाले (बागलाण), किरण नांगरे (चांदवड), वंदना भामरे (देवळा), विलास जमदाडे (दिंडोरी), विजय सहाने (इगतपुरी), जिभाऊ निकम (कळवण), यतीन शेलार (मालेगाव), राजू घोटेकर (नांदगाव), शशिकांत गुट्टे (नाशिक), अनुसया पाटील (निफाड), वैभव शिंदे (पेठ), सोनाली शिंदे (सिन्नर), रघुनाथ चौधरी (सुरगाणा), केशव गावित (त्र्यंबकेश्वर), पंकज गायकवाड (येवला), दत्तात्रय गुंजाळ (त्र्यंबकेश्वर), नवनाथ सांगळे (सिन्नर), प्रवीण पाटील (नांदगाव), एकनाथ गायकवाड (सुरगाणा), प्रीतम आवटे (पेठ), अशा वीस शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ९ वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विशेष शिक्षकांनाही गौरविण्यात आले. त्यात प्रज्ञा आपटे, रमाकांत भोर, अश्विनी भार्गवे, तन्मय कर्णिक, हेमंत पुरकर, मधुवंती देशपांडे, डॉ. अविनाश धर्माधिकारी, स्मिता घोटकर आणि विनायक साने यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथ लीडर सुरेखा राजपूत, संकेत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. सुरेखा राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी अध्यक्ष मंगेश अपशंकर यांनी प्रास्ताविक व अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. सचिव डॉ. गौरव सामनेरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.