इतर

नाशिक ला उदोजी मराठा बोर्डिंग येथे रोटरी हाट बाजारचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी

खरेदीचे कितीही नियोजन केलं तरी गृहिणींच्या मनासारखी खरेदी होईलच याची शाश्वती नसते आणि त्यातही दिवाळीच्या सणासुदीची खरेदी म्हणजे मोठंच जिकिरीचं काम. पण यंदा रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित रोटरी हाट बाजारात विना कटकट दर्जेदार वस्तुंची शाॅपिंग करता येणार आहे.

दिवाळीसाठी लागणाऱ्या साड्या, ड्रेस मटेरिअल, आकाश कंदील, पणत्या व चविष्ट दिवाळी फराळाचे आइटम्सची दर्जेदार खरेदी एकाच ठिकाणी करता येईल. यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे आदिवासी विकास महामंडळा कडून नव्याने लॉन्च करण्यात आलेले प्रॉडक्ट या हाट बाजारात प्रथमच उपलब्ध होतील . खरेदी जत्रा फक्त रविवारच्या दिवशी भरणार आहे याची नोंद घ्यावी.
रोटरी हाट बाजारचे उद्घाटन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालिका श्रीमती लीना बनसोड यांच्या शुभहस्ते सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे
रोटरीच्या या उपक्रमात सर्वांनी भरघोस सहभाग नोंदवावा आणि खरेदी सुद्धा करावी असे आव्हान रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत ,सचिव प्रशासन शिल्पा पारख, सचिव प्रकल्प हेमराज राजपूत जनसंपर्क संचालक निलेश सोनजे यांनी केले आहे.
हाट बाजाराचे नाविन्यपूर्ण नियोजन वकील राजेश्वरी बालाजीवाले ,चेतन पवार ,डॉ विश्वजीत दळवी, डॉ नेहा विधाते यांनी केले आहे.
हाट बाजारात मोफत प्रवेश असून रविवारी २७/१०/२०२४ रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत नाशिककरांनी आपली उपस्थिती नोंदवावी.

महिला गृहउद्योग,बचतगट यांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे. महिला व घरगुती व्यवसाय ह्याना प्रोत्साहन देणे तसेच नाशिककर ग्राहकाना चविष्ट खाद्यपदार्थ व मनमोहक कपडे आकर्षक दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांनी आवर्जून सांगितले .

दिवाळी फराळ, चकली,शेव,चिवडा,लाडू,आकाशकंदील, शोभेच्या वस्तू,कडधान्य,डाळी,तेल,भाजी पाला,साडी,ड्रेस मटेरियल , भेटवस्तू अशा अनेक वस्तूंचे ५० स्टॉल प्रदर्शनात असणारआहेत.
महिला गृहउद्योग,बचतगट यांचा प्रदर्शनात सहबाग असणार आहे.महिला व घरगुती व्यवसाय ह्याना प्रोत्साहन देणे तसेच नाशिककर ग्राहकाना चविष्ट खाद्यपदार्थ व मनमोहक कपडे आकर्षक दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांनी आवर्जून सांगितले .
प्रशस्त पार्किंग ची मोफत व्यवस्था देखील प्रदर्शनस्थळी उपलब्ध आहे त्यामुळे चोखसदळ ग्राहकांनी हाट बाजारास अवश्य भेट द्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button