विखे म्हणाले मला मारन्याचा कट होता
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण आहे. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यभरतातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरून वसंत देशमुखांसह सुजय विखे- पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचा निषेध केला जात आहे. यावर आता सुजय विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘मला जीवे मारण्याचा कट होता.’, असा आरोप माजी खासदार सुजय विखेंनी केला आहे.
सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ‘सभेतील झालेलं महिलांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला आणि आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील जेष्ठ आणि थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही. अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं आहे.’
मला जीवे मारण्याचा कट असल्याचा दावा सुजय विखेंनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘मात्र हे सगळं घडल्यानंतर ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आणि पुढच्या १५ मिनिटांत त्या गावच्या एक्झिट पोइंटवर प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या. दगडांनी गाड्या फोडल्या गेल्या. महिलांना हात धरून बाहेर ओढलं गेलं. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आलं. मी सभेतून निघताना त्यांच्याच यंत्रणेतून मला एकाचा फोन आला. हे असं करणार आहेत तुम्ही या रस्त्याने येऊ नका दुसऱ्या रस्त्याने जा असं त्याने मला सांगितलं. मात्र मी जाण्याआधी ज्या गाड्या निघाल्या होत्या त्या यातून वाचू शकल्या नाही.’
तसंच, ‘माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला. वक्तव्य करणाऱ्याला अटक करा माझं काही म्हणणं नाही. मात्र सर्वसामान्य घरातील महिलांना रात्री गाडीतून बाहेर ओढून हल्ला करता. हे संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्र देऊन तक्रार करणार आहोत. हल्ला होत असताना स्थानिक आमदाराचे भाऊ, स्वीय सहाय्यक, माजी जिल्हा परिषद सदस्य हे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. अशा दहशतीच्या वातावरणात निवडणुका होऊ शकत नाही आणि यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊन मार्गदर्शन घेणार आहोत.’, असे सुजय विखेंनी सां गीतले
संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या मांडला. यामुळे विखे-थोरात कुटुंबियातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले. आता यावर सुजय विखे यांच्या मात्रोश्री शालिनी विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.शालिनी विखे पाटील म्हणाल्या की, वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही निषेध करतो. कोणाची जरी मुलगी असली तरी असं वाक्य कोणतीही महिला सहन करू शकत नाही आणि असं बोलण्याचाही अधिकार कोणाला नाही. कोणीही पातळी सोडून अशी वक्तव्य करू नये. प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रश्न जो तो सोडवत असतो.कालच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. हा सुजय विखे विरोधात जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता हे काल दिसून आलं. कुत्रा हाकलायचं म्हटलं तरी काठी सापडावी लागते. मात्र यांच्या गाड्यांमध्ये काठ्या होत्या, हे पोलिसांना समजलं आहे. कुणी गाड्या जाळल्या? कोण-कोण होतं हे सगळं माहित आहे. आमच्या युवकांना झालेली मारहाण चुकीची आहे. राजकारण करताना कोणीही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी तो डोक्यावर पडलाय हे बोलणं कितपत योग्य आहे. सुजयच्या भाषणातून कोणतीही अशी टीका झालेली नाही. कालची घटना पूर्व नियोजित कट होता. खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण सुरू आहे ते बंद करावे.