श्री जगदंबा कमला भवानी कबड्डी निवासी विद्यालय श्री देवीची माळ करमाळा या शाळेला पुरस्कार

(संजय महाजन)
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार सन 2024 हा श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ, करमाळा या शाळेला देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळा राबवीत असलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, सामाजिक कार्यात शाळेचे असलेले योगदान, शाळेला मिळालेले विविध पुरस्कार व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती या निकषावर शाळेची निवड करण्यात आली. यावेळी आयुष्य व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राचे डॉ. संदीप तांबारे साहेब, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, अजित कुंकलोळ, डॉक्टर रामचंद्र जगताप इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला ..
यावेळी संस्थेचे सचिव मा.श्री. चित्रसेन पाथरूट सर, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला.. या पुरस्काराबद्दल संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संस्थेच्या अध्यक्षा. मा. सुशीला पाथरूट मॅडम, संस्थेचे सचिव श्री. चित्रसेन पाथरूट सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ पाथरूट सर यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले..