इतर

नाशिक मध्ये रोटरी हाट बाजाराला ग्राहकांच्या भरघोस प्रतिसाद

नाशिक दि 27

उदोजी मराठा बोर्डींग गंगापूर रोड येथे २७/१०/२४ रोटरी हाट बाजारचे उद्घघाटन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालिका श्रीमती लीना बनसोड यांच्या शुभहस्ते पार पाडले.

आजच्या रोटरी हाट बाजाराला ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादाने, स्टॉल धारकांच्या ओसंडत्या उत्साहाने आणि रोटेरियनच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीने दणक्यात सुरुवात झाली. 

लीना बनसोड मॅडम यांनी शेतकरी बाजारातील उत्साह  आणि या सातत्याच्या गतिविधी बद्दल रोटरी क्लबचे कौतुक केले आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती करून घेतली. 

त्यांची या परिसरात येण्याची पहिलीच वेळ होती  आणि हा निसर्गरम्य परिसर त्यांना इतका पसंत पडला की त्यांच्या डोक्यात इथे आदिवासी विकास विभागाकडून काही तरी भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात प्रकल्प करण्याचे विचार चक्र सुरू झाले. 

त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी विकास भवन करीत असलेल्या कार्याची सविस्तर रुपरेषा दिली.

यावर्षी प्रथमच हाती घेण्यात आलेला हा उपक्रम आता दरवर्षी घेण्यात यावा असे ठरविण्यात आले 

रोटरी हाट बाजारात ५५ पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले .महिला व्यवसायकांनी , महिला बचत गट ह्यानी रोटरी मुळे अल्पदरात आपल्या गृहउद्योग ला उंच भरारी घेण्याची एक प्रेरणा आणि संधी मिळाल्याचे सांगितले.

सर्व सहभागी स्टॉलधरकाना उत्तम दर्जाची उत्पादने चोखंदळ ग्राहकानपर्यंत पोहचवता आल्याने त्यानी रोटरी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले.

सर्वांच्या सहभागाने एखादा मोठा उपक्रम कसा लिलया तडीस नेला जाऊ शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण हाट बाजाराच्या नियोजनावरून मंथलीडर्स  डॉ. विश्वजीत दळवी  आणि डॉ. नेहा मेहेर ह्यांनी दाखवून दिले.

स्टॉल बुकिंग पासुन ते देखरेखी पर्यंतचे सगळे उत्तम नियोजन मंथ लिडर्स समवेत रोटे. राजेश्वरी बालाजीवाले, रोटे. चेतन पवार आणि .सुधीर वाघ ह्यांनी केले.

रोटरी एनक्लेव्ह चेअरमन अवतारसिंह,

रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष. ओमप्रकाश रावत ह्यानी मनोगत व्यक्त केले.सचिव प्रशासन  रोटे. शिल्पा पारख ह्यानी आभार प्रदर्शन केले.करक्रमाचे सूत्रसंचलन राजेश्वरी बालाजीवाले ह्यानी केले.

सचिव प्रकल्परोटे. हेमराज राजपुत ह्यांच्या संयोजनाने पार पडला.  तसेच पास्ट प्रेसिडेंट. मंगेश अपशंकर, प्रेसिडेंट इलेक्ट रोटे. गौरव समनेरकर,आरएमबी अध्यक्ष अमित पगारे  ,रोटे. मनीष चिंधडे, आणि रोटे. मकरंद चिंधडे निलेश सोनजे,अनुजा चौघुले  ह्यांचीही उपस्थिती लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button