जांभळी येथील कानिफनाथ यात्रा महोत्सव संपन्न!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज चा यात्रा महोत्सव संपन्न झाला
जांभळी गावाची विशेषता म्हणजे जांभळी गावातील प्रत्येक घरांमधून एक ना एक आर्मी मेजर किंवा महाराष्ट्र पोलीस या पदावर १५० ते २०० मुले सरकारी पदावर काम करत असून पाथर्डी तालुक्यात जांभळी गावची ओळख म्हणजे आर्मी फौजी चे गाव म्हणून संबोधले जाते कारण की तालुक्यात जांभळी गावा इतके फौजी इतर कोणत्याही गावांमध्ये नसल्याने या गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी आहे तसे पाहता हे गाव साठ ते सत्तर टक्के ऊस तोडणी करणारे गाव होते परंतु गरीब कुटुंबातील या सर्व मुलांनी असा विचार करून जोमाने जिद्द व मेहनत अभ्यास करून ते उच्च पदावर आहेत
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळ असल्याने यात्रा नव्हती याच वर्षी चैतन्य कानिफनाथ महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात आर्मी फौजी व महाराष्ट्र पोलीस व नव तरुणांनी यात्रा मोठ्या स्वरूपात पार पाडली यामध्ये कोरोना काळामध्ये ज्या लोकांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जांभळी येथील २०० फौजी व पोलीस यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यात्रेच्या औचित्य साधून लोकांना यात्रेच्या निमित्ताने कोरोना योद्धा पुरस्कार पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी पुरस्कार वितरण करताना शेवगाव पाथर्डी नेवासा उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी कार्यक्रमाची सांगता केली यावेळी प्रदूषण आयुक्त अधिकारी दिलीप राव खेडकर यांनी चैतन्य कानिफनाथ मंदिरासाठी १००००० लाख रुपयाचा निधी मंदिर बांधकामासाठी सुपूर्द केला त्याबरोबर पंचायत समिती सभापती सुनिता गोकुळ दौंड यांनी 51 हजार रुपये चा निधी मंदिर उभारणीसाठी देण्यात आला जांभळी ग्रामस्थांकडून खेडकर आणि दौंड यांनी मंदिरासाठी जी मदत केली यासाठी जांभळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले
यात्रेमध्ये जांभळी गावातील ग्रामस्थांची मनोरंजन व्हावे यासाठी लोकनाट्य ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम ठेवला होता याचा आनंद ग्रामस्थांनी मनमुराद घेतला.
या यात्रेच्या व कोरोना योद्धा पुरस्कार कार्यक्रमासाठी आरोग्याधिकारी भगवानराव दराडे, भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, डॉ.ज्ञानदेव आव्हाड, सरपंच सुरेखा ढाकणे. किसन आव्हाड, आजिनाथ दराडे, दादासाहेब खेडकर, किरण शिरसाट, बाबूराव बिडकर, गणेश आव्हाड, अशोक बिडकर, सोमनाथ आव्हाड, अनिल आव्हाड आदी ग्रामस्थ व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.