नाशिक येथे आदिशक्ती पुरस्कार सन्मान सोहळा सम्पन्न

नाशिक प्रतिनिधी
दिनांक २७/१०/२०२४ रोजी श्री राधिका बहुद्देशीय संस्था पंचवटी नाशिक यांचेकडून आदिशक्ती सन्मान सोहळा पुरस्काराचे वितरण करण्यात आले मान्यवर मधुकर कड सर ( वरिष्ठ विभागीय पोलीस निरीक्षक पंचवटी नाशिक ) त्याचप्रमाणे कल्याणसिंग पाटील, हर्षली भोसले, डॉक्टर चेतनाताई सेवक राणीताई कासार, विकी कुठे, जावेद शेख सचिव, डॉक्टर संदीप काकड, डॉक्टर श्याम जाधव, डॉक्टर अशोक पगारे सर, प्रवीण जाधव, व वैशाली देवरे आदी मान्यवर उपस्थित होते

आदिशक्ती सन्मान सोहळा एकूण ८० महिलांना पुरस्कार देण्यात आले महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकूण२० जणांना देण्यात आले आदिशक्ती सन्मान सोहळा कल्पनाताई जगताप यांना सन्मानित करण्यात आले त्यांचे कार्य अंध अपंग यांना मदत करणे कोविड सेंटर मध्ये त्यांचा हातभार लागला असून सामाजिक कार्याचे आवड असल्याने श्री राधिका बहुउद्देशीय संस्था यांचे कडून त्यांना सन्मानित करण्यात आले
जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपला उद्योग व्यवसायात यशाची शिखरावर असलेल्या समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आदिशक्ती सन्मान सोहळा देऊन गुण गौरव करण्यात आले या पुरस्काराचे ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले
