राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय शेणित येथील विद्यार्थ्यांनी घेतला जैवविविधतेचा आनंद .

अकोले प्रतिनिधी
अलेझम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत बायफ संस्था नाशिक यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने अकोले तालुक्यातील ,टिटवी, कोदणी , मान्हेरे, पाभुळवंडी, आणि शेणीत या गावात स्थानिक पिके वान संवर्धन व पुनर्वापर यावर आधारित जीविका प्रकल्प कार्यान्वित असून आज या प्रकल्प अंतर्गत ठोकळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना कळभात मूल्यमापन आणि संवर्धन केंद्राला भेट दिली.
या संवर्धन केंद्रामध्ये 17 प्रकारचा काळभोर पोषणयुक्त वाणांची लागवड केलेली दिसून आली. या स्थानिक देशी पारंपारिक भात जातींची लागवड बघून मुलांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी प्रकल्प समन्वयक योगेश नवले सर यांनी संवर्धन व मूल्यमापन केंद्राचे महत्व व प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला. तसे शाळेचे मुख्याध्यापक श्री दातीर सर यांनी स्थानिक जैवविविधता संवर्धन ही काळाची गरज असून येणाऱ्या पुढील काळात विद्यार्थ्यांनी जैवविविधतेबरोबर पर्यावरणाचेही संवर्धन करावे याचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी शेतकरी भाऊसाहेब जोशी, रामजी धोंगडे, नारायण धोंगडे, रामकृष्ण भांगरे, आनंदा गोलवड, शाळेचे मुख्याध्यापक दातीर सर, जाधव सर, नवले सर, बेनके सर, बडे सर, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
——– –