लय आवडतेस तू मला मालिका कलाकारांची वात्सल्य वृद्धाश्रमास भेट

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
आज दिनांक ३०/१०/२०२४ रोजी वात्सल्य वृद्धाश्रम पंचवटी नाशिक या ठिकाणी कलर्स मराठी वरील सुरू असलेली लय आवडतेस तु मला या मालिकेतील कलाकार तन्मय जक्का, सानिका मोजर, प्रोडक्शन टीम उद्धव चव्हाण तुषार जाधव, बाबु शेख यांनी भेट दिली. यावेळी या कलाकारांशी सूत्रसंचालक सुरेश चव्हाण यांनी खास संवाद देखील साधला. त्यांनी देखील आजी-आजोबांशी संवाद साधत दिवाळी निमित्ताने त्यांना दिवाळी भेट देखील दिली, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा समारोप करताना गाण्यावर ताल धरून त्यांना देखील नृत्य करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण नाशिकमध्ये सुरू असून या टीमने आश्रमातील आजी आजोबांना त्यांच्या एका एपिसोड मध्ये सहभागी करून घेत आजी आजोबांना दिवाळीनिमित्ताने सुखद धक्काच दिला,

कारण त्यांच्यासाठी ही विशेष दिवाळी भेट त्यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रभर यानिमित्ताने वात्सल्य वृद्धाश्रम आणि येथील आजोबा हे दिसणार असून याचा आनंदच मात्र वेगळा आहे असे मत यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार सर यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनीच आपापल्या प्रतिक्रिया देत दिवाळी साजरी केली. सर्व टीमने आजी आजोबांचे कृपाशीर्वाद घेतले, या मालिकेचे निर्माते दिग्दर्शक सचिन मोहिते सर हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी आजी आजोबांना खूप साऱ्या शुभेच्छा देत दिवाळी भेट देखील दिली. त्यांचा देखील सन्मान टीमच्या सर्व प्रतिनिधी तर्फे करण्यात आला या कार्यक्रमासाठी वात्सल्यचे योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी मेहनत घेतली सर्व मान्यवरांचा वात्सल्य तर्फे सन्मान करण्यात आला.
