इतर

वनकुटे येथे माहूरगडावरून आणली तीन दिवसात ज्योत

तुकाई देवीच्या पालखीची उत्साहात मिरवणूक

पारनेर/प्रतिनिधी :
वनकुटे येथील तुकाईमाता देवस्थान ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सवा दरम्यान तुकाईमाता भक्त मंडळ ९० ते १०० युवा भक्तांनी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या रेणुका माता देवस्थान माहूरगढ जिल्हा यवतमाळ येथून पायी चालत ज्योत आणली. तीन दिवसांमध्ये अविरत दिवसरात्र चालून वनकुटे येथे घटस्थापनेच्या दिवशी पोहचले व गावात येऊन ज्योतीची व देवीच्या पालखीची सुवाद्य मिरवणूक काढली व त्यानंतर देवीजवळ घटस्थापना केली. तुकाई माता गडावर ९ दिवस नवरात्राचे आयोजन केलेले असून त्याचा परिसरातील भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे तुकाईमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भानुदास गागरे यांनी आवाहन केले आहे.


माहूरगड येथून ज्योत आणण्यासाठी बाळू गुळवे, कारभारी खामकर, डॉ नितीन रांधवण, भास्कर गागरे, विकास औटी, गंगाराम बरकडे, चेअरमन ज्ञानेश्वर गागरे, बाबाजी गागरे, सुरेश डुकरे, दत्ता काळनर, कैलास डुकरे, अण्णासो डुकरे, अशोक वाबळे, सोहेल शेख, भूषण वाबळे, गणेश मुसळे, सागर सांबरे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


रेवण लोणकर, संदीप रांधवण, सोमनाथ गागरे, नारायण साळवे, योगेश शिंदे, मयूर डुकरे, निखिल गागरे, संपत घोडके, रामा गुंजाळ, राहुल गुंजाळ, भाऊसाहेब बर्डे, सोमनाथ बर्डे, सुंदर बर्डे, विश्वनाथ पवार, अजित गागरे, भाऊसाहेब साळवे, शिवा सूळ, बाळू गागरे, भाऊसाहेब गागरे, बाबाजी डुकरे, नशिर शेख, निलेश साके, पंढरीनाथ हारदे, कारभारी मुसळे, संतोष केसकर, गणेश केसकर, डॉ. तुकाराम कसबे, शिवाजी बरकडे, याकूब शेख, आचारी, पप्पू साळवे व मारुती केसकर, भिवा बरकडे, संपत पैसे, अजित वाळुंज, यांच्यासह इतर अनेक तुकाई माता भक्तांनी भरपूर परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button