इतर

वनकुट्याच्या सरपंचांकडून गावातील वंचितांना कपडयांची भेट !

पारनेर : प्रतिनिधी

 तालुक्यातील वनकुटे येथील चरपटीनाथांचा यात्रोत्सव येत्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान संपन्न होत असून या यात्रोत्सवापासून गावातील वंचित बांधव दुर राहू नयेत यासाठी सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांनी विशेष काळजी घेतली आहे. गावातील सर्व वंचित पुरूषांना पोषाख तर महिलांना त्यांनी साडीचोळीची भेट दिली. सरपंच राहूल झावरे यांची भेट हाती पडल्यानंतर वंचितांच्या चेहयावर हसू खुलले ! 

 लोकनियुक्त सरपंच म्हणून अ‍ॅड. राहूल झावरे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी विविध विकास कामे मार्गी लावून गावाचा चेहरा मोहरा बदलला.  शासनाच्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्यातही त्यांनी तालुक्यात पहिला क्रमांक पटकाविला. गावातील प्रत्येक नागरीकाच्या समस्या दुर करण्यासाठी आहोरात्र झटणाऱ्या अ‍ॅड. झावरे यांनी वंचितांनाही आपला आधार वाटेल अशीच कामगिरी अजवर केली आहे. कोरोना संकटातही अ‍ॅड. झावरे हेच सामान्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिले. गरजूंना किराणा तसेच अत्यावष्यक वस्तूंचे वितरण करण्याबारोबरच कोरोना बाधितांना त्यांनी मोफत तसेच अल्पदरात उपचार मिळवून दिले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या जिल्हयातील पहिल्या कॅम्पचे वनकुटे येथे आयोजन करून आपण कर्तव्यदक्ष पदाधिकारी असल्याचे त्यांनी कृतीतून सिध्द केले. 

 दुर्गम तसेच आदीवासी बहुल असलेल्या या गावामधील आदीवासी कुटूंबियांना समाजाच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी अ‍ॅड. झावरे यांनी विविध उपक्रम राबविले. आदीवासींच्या अनेक योजना त्यांनी घराघरापर्यंत  पोहचविल्या. के. के. रेंजचे संकट आल्यानंतर आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून हे संकट परतवून लावण्यातही अ‍ॅड. झावरे यांचा पुढाकार होता. 

 कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत चरपटीनाथांचा यात्रोत्सव साजरा झाला नव्हता. आता कोरोनाचे संकट दुर झाल्याने यंदाचा यात्रोत्सव धडाक्यात साजरा होणार आहे. या यात्रोत्सवाचा आनंद गावातील वंचितांनाही झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी सर्वांना स्वखर्चातून पोषाख तसेच साडीचोळीची भेट दिली. अ‍ॅड. झावरे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे आमदार नीलेश लंके यांच्यासह मतदारसंघातील विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button