अकोल्याची निवडणूक दोन पवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक! , भाजपाचे वैभव पिचड यांची अखेर बंडखोरी!

सुनील गिते
अकोले -अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी चित्र स्पष्ट झाले विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड ,जिल्हा बँकेचे संचालक अमित अशोकराव भांगरे यांच्यासह मधुकर तळपाडे ,मारुती मेंगाळ असे नऊ उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात राहिले आहे
अकोले विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत एक अर्ज अवैध ठरल्याने. 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी रामदास दत्तू लोटे , शकुंतला भाऊसाहेब धराडे, गणेश काशिनाथ मधे या तीन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले आहे यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता नऊ उमेदवार उभे आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी अशा होणाऱ्या राजकीय सामन्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या दोन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या लढाईत सात अपक्ष उमेदवार आपले भविष्य आजमावत आहे
जिल्हा बॅँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष अमित अशोक भांगरे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चिन्ह -तुतारी वाजविणारा माणूस)
विद्यमान आमदार डॉ.किरण यमाजी लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),(चिन्ह घड्याळ)
पांडुरंग नानासाहेब पथवे (राष्ट्रीय समाज पक्ष चिन्ह ट्रम्पपेट)
भिवा रामा घाणे (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी),
किसन विष्णू पथवे .(अपक्ष चिन्ह जातं)
भाजपाचे नेते माजीमंत्री मधुकर पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव मधुकरराव पिचड (अपक्ष,आटो रिक्षा)
शिवसेना नेते मधुकर शंकर तळपाडे, (अपक्ष – शिट्टी
पं.स.चे माजी उपसभापती मारुती देवराम मेंगाळ,(अपक्ष चिन्ह सफरचंद)
विलास धोंडीबा घोडे, (चिन्ह हेल्मेट)
असे नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे हे काम पाहत आहेत.
भाजपा चे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होत पिचड यांनी बंडखोरी केली आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे महायुती कडून ही जागा अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली आहे मात्र या उमेदवारीमुळे अकोले तालुक्यात महायुती महायुतीला तडा गेला आहे भाजपाचे वैभव पीचड यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीच्या उमेदवारा सोबत काम न कर न्या चा निर्णय घेतला आहे महायुतीचे मित्रपक्ष असणारे आरपीआय ने देखील महायुती सोबत स्थानिक सत्तेत सहभागी मिळत नसल्याने महायुती सोबत न राहण्याचा निर्णय आज आर पी आय च्या निर्धार बैठकीत घेतला आहे यामुळे महायुतीचे डॉक्टर लहामटे यांच्या अडचणी वाढल्या आहे
राज्यात महायुतीची युती असली तरी तालुक्यात मात्र महायुतीत बिघाडी झाली आहे खुद्द भाजपचे वैभव पिचड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांचे वडील नाशिक येथे दवाखान्यात उपचार घेत आहे वैभव पिचड यांची तयारी नसतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडले वैभव पीचड यांनी आज आपला माघारीचा अर्ज नाशिक येथून यशवंत आभाळे यांच्या मार्फत अकोले येथे पाठविला मात्र कार्यकर्त्यांना हे समजतातच एकच गोंधळ घालत अर्ज माघारी घेण्यास विरोध करून तो अर्ज फाडून टाकला यामुळे अकोल्यात आता महायुतीचे किरण लहामटे आणि महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित भांगरे यांची सरळ होणार असली तरी बंडखोरी करून उभे असणारे वैभव पीचड यांची उमेदवारी निर्णयक ठरणारी आहे महाविकास आघाडी कडून उमेदवारी ची मागणी करणारे शिवसेने चे मधुकर तळपाडे व मारुती मेंगाळ यांनी ही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी चे दंड थोपटून आमदारकीचे बाशिंग बांधले आहे