11 डिसेंबर ला नागपूर ला कंत्राटी वीज कामगारांचा मोर्चा

07 / 12 / 2023
पुणे दि ७ विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण अजुनही प्रलंबितच आहेत, दि 1 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालय मुंबई येथे काढलेल्या मोर्चा च्या वेळी झालेल्या त्रिपक्षीय बैठकी मध्ये संघटनेच्या शिष्टमंडळ ला कंत्राटदार मुक्त रोजगार, शास्वत रोजगार, भरती प्रकीया मध्ये कंत्राटी कामगारांना समाविष्ट करण्यासाठी योजना अशी विविध आस्वासने प्रशासनाने दिली होती,
पण या मधील कोणत्याही बाबतीत ठोस कार्यवाही अद्याप पर्यंत सुरू झाली नाही, त्यामुळे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) दि 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशना मध्ये चाचा नेहरू पार्क पासून विधानसभा पर्यंत लक्षवेधी मोर्चा काढणार आहे, या मध्ये न्याय न मिळाल्यास मा उर्जा मंत्री यांच्या निवासस्थानी मोर्चा वळवावा लागेल या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवहान महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ)अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी झालेल्या बैठकीत ईशारा दिला आहे.
महापारेषण कंपनीत 1900 तंत्रज्ञ पदांच्या भरती साठी अर्ज भरण्यास दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात झाली.
नियमित मंजूर रिक्त पदावर वर्षानुवर्षे कार्यरत अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना भरती वेळी मार्क सोबत वयात सवलत देऊ असे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी 4 जानेवारी 2023 रोजी सह्याद्री शासकीय निवास येथे संपाच्या पार्श्वभूमीवर दिले होते. यावेळी प्रधान सचिव ऊर्जा मा.आभा शुक्ला व तिन्ही वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बैठकीला उपस्थित होते.
4 जानेवारी 2023 नंतर कोणतीही चर्चा न होताच परस्पर प्रशासनाने भरती जाहीर केली याचा अर्थ वीज कंपनी प्रशासनावर त्यांची पकड नाही.मंत्र्यांच्या सूचनेला प्रशासन केराची टोपली दाखवत आहे यातच मोठे गौड बंगाल आहे असा आरोप सचिन मेंगाळे यांनी केला आहे.
.ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना आता पर्यंत संघटनेने प्रत्यक्ष 15 वेळा निवेदन दिले. मात्र भारतीय मजदूर संघाच्याच संघटनेला त्यांनी आजवर भेटीसाठी न दिलेला वेळ व दिलेल्या आश्वासनाचा विसर त्यांना पडल्याने संघ परिवारात मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्या मुळे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने ही भरती प्रक्रिया थांबवून भारतीय मजदूर संघाच्या कंत्राटी कामगार संघटना संघटने सोबत बैठक आयोजित करून कंत्राटदार मुक्त रोजगार द्यावा. कंत्राटी कामगार हितार्थ चर्चे अंती निर्णय घ्यावा तो पर्यंत भरती प्रक्रिया करू नये अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांने अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली आहे. संघटनेला या बैठकीत विविध जिल्हामधील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.