तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्थ पदावर नगरच्या सौरभ बोरा यांची निवड

मुंबई दि 5- जगातील सर्वांत श्रीमंत व सर्वात मोठ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (आंध्रप्रदेश) ट्रस्टच्या विश्वस्तपदी नगरचे उद्योजक सौरभ बोरा यांची तिसऱ्यांदा फेर निवड झाली आहे. बुधवारी (ता. ३० ऑक्टोबर) आंध्रप्रदेश सरकाने देवस्थानच्या नव्या विश्वस्तांची घोषणा केली. यामध्ये नगरच्या सौरभ बोरा यांना तिसऱ्यांदा स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून बोरा हे एकमेव विश्वस्त आहेत. देवस्थानच्या इतिहासात सौरभ बोरा यांच्या रूपाने पहिल्यांदाच एकाच व्यक्तीला विश्वस्तपदी तीनदा संधी देण्याची घटना घडली आहे. याआधी सलग सहा वर्ष सौरभ बोरा यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना ही पुन्हा संधी मिळाली आहे. कोणतेही राजकीय वलय नसताना सौरभ बोरांच्या या ऐतिहासिक हॅटट्रिकबद्दल नगरच्या नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. सौरभ बोरा हे तिरुपती बालाजी भगवंताचे नित्सिम भक्त आहेत. ते सध्या मुंबई येथे वास्त्याव्यास आहेत.