
संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी:
संगमनेर श ह रात प्रवरा नदी पात्रातून दिवसा ढवळ्या बैलगाडी आणि रिक्षातून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची सूत्रे हातात घेताच संगमनेर शहर आणि तालुक्यात व जिल्ह्यातील इतर तालुक्यात फोपावलेली वाळू तस्करी कायमस्वरूपी संपवण्यासाठी कडक धोरण घेतलेले असताना संगमनेरात मात्र ही वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही.
यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉली आणि टेम्पोच्या साह्याने रात्रीची होणारी प्रवरा नदी पात्रातील वाळूची तस्करी आता चक्क दिवसा ढवळ्या बैलगाडीने आणि रिक्षाने सुरू आहे. याकडे मात्र महसूल प्रशासन उघड्या डोळ्याने पहात आहे काही ठिकाणी तर वाळू तस्करी साठी गाढ वांचाही वापर होत आहे असे असताना संगमनेरचा महसूल विभाग मात्र या वाळू तस्करी कडे दुर्लक्ष करत आहे
अगदी सकाळ पासून संध्याकाळ पर्यत बिनदिक्कतपणे बैलगाडी आणि रिक्षाद्वारे वाळूचा उपसा होत आहे वाळू चोरांच्या टोळ्या आता या मार्गाने वाळू ची चोरी करत आहे त्यांना कोणाचेही भय आणि भीती. वाटत नाही विरोध करणारांना अरेरावी करत आहे त्यांना कोना चे राजकीय पाठबळ असल्याशिवाय त्यांचं हे चोरीचे बळ वाढणार नाही
काही जण वाळू चाळतात तर काहीजण चाळलेली वाळू गोण्यांमध्ये भरून ती बैलगाडी आणि रिक्षाद्वारे इच्छित स्थळी घेऊन जात आहेत. बैलगाडी आणि रिक्षाची एक खेप प्रत्येकी पाचशे ते एक हजार रुपयाला विकली जात