धामणगाव आवारी येथे मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
हरिश्चंद्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर व हरिश्चंद्र मेडीकल फशऊंडेशन, ट्रायबल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर आणि ग्रामपंचायत, धामणगांव आवारी (ता. अकोले, जि. अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगांव आवारी गावामध्ये
मोफत आरोग्य निदान शिबीर आयोजित केले आहे
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य विमा योजनेअंतर्गत ९७१ उपचार आणि १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ट आहेत.या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरामध्ये मोफत तपासणी आणि निदान केले जाणारअसून, आपण या शिबीराचा लाभ घेऊन आपण आपल्या कुटुंबातील सदस्याची तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे
मंगळवार दिनांक १३/०९/ २०२२ रोजी: सकाळी ९:०० तेदुपारी १२:०० पर्यंत विठ्ठल रुख्मिनी मंदिर, धामणगांव आवारी, ता. अकोले शिबिर आयोजित केले असून यावेळी डॉ. एम. के.भांडकोळी, डॉ. सौ. ज्योती भांडकोळी हे रुग्णांची तपासणी करणार आहे शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्क :- 9420032244 / 7391919122 / 9325889926