डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदे तून त्यांच्या विचारांचे दर्शन -शेषराव पैलवान

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण विश्वाला महान संदेश देऊन समाजातील सर्वच घटकासाठी फार मोठे काम केले. हे त्यांच्या ग्रंथसंपदेतून त्याचे दर्शन घडते. प्रत्येकाने आपल्या वाचनाच्या कक्षा वाढव्यात,त्यांच्या अनेक साहित्यकृतीचे वाचन करून त्या अंगीकृत करणे काळाची गरज आहे. असे मत मजलेशहरचे माजी उपसरपंच शेषराव पहिलवान यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथे पहिलवान कुटुंबीयांनी अनेक वर्षाची परंपरा जपत सकाळीच पंचशीलाचे वाचन करून भारतीय राज्यघटने विषयी भारतीय संविधानाचे वाचन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी केली. यावेळी मजलेशहरचे सरपंच अशोक वकीलराव लोंढे, उपसरपंच अशोक शिवाजी लोंढे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ ह.भ.प. राधाकृष्ण महाराज बोरुडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील पहिलवान, मजलेशहरचे माजी उपसरपंच शेषराव पहिलवान, पत्रकार शहाराम आगळे, मारुती खरात, अशोक ओहोळ, प्रवीण पहिलवान, भोरू पहिलवान, सिद्धार्थ पहिलवान, अशोक पहिलवान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.