इतर

‘बालदिनानिमित्त’ महिला व पुरुषांसाठी आगळावेगळा उपक्रम….

.

सोलापूर : ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं सर्वच म्हणतात. जसे माणसाचे वय वाढतो तसे विचारही बदलतो. वय मोठे झाल्यावर लहान व्हावेसे वाटते. परंतू, वयाने मोठे झाल्यावर लहान मुलांसारखे खेळावे – बागडावे असे मनोमन इच्छा असूनही ‘लोक काय म्हणतील’ ? ह्या एकाच प्रश्नाने मागे सरत असतात. याचा सारासार विचार करुन बालदिनाचे औचित्य साधून मोठ्यांसाठी लहान मुलांसारखे खेळ खेळून आनंद लुटण्यासाठी पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’ यांच्या संयुक्तिकपणे अनोखा व आगळावेगळा उपक्रम रविवार १७ नोव्हेंबर रोजी बाल’फन’ कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती ‘पद्मकमळ’चे गोपीकृष्ण वड्डेपल्ली व ‘सखी संघम’च्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी दिले आहे.

नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात ‘बालदिन’ (चिल्ड्रन डे) साजरा करतात. मोठ्यांना सुद्धा (महिला-पुरूषांना) हा विचार येतो की, आपणही सहभाग होऊन आनंद लुटावा. यासाठी, रविवार १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक ४ वाजता सोलापूरातील कर्णिक नगर येथील पावन गणपती जवळील असलेल्या ‘उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय’ येथे आयोजन केले आहे. सहभागी घेणा-या महिला व पुरुषांना पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संघमच्या वतीने खेळाचे साहित्य दिले जातील. ह्या बाल’फन’च्या खेळात उत्कृष्टरित्या खेळणा-यांना दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे ‘पद्मकमळ’तर्फे आकर्षक बक्षीसे जाईल. ह्या बाल’फन’च्या खेळात जास्तीत जास्त महिला व पुरूषांनी सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी ‘पद्मकमळ’चे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली (+919371346810) यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत, असे आवाहन ‘सखी संघम’च्या उपाध्यक्षा मंजुळा आडम – कल्याणी पेनगोंडा, सहसचिव – लक्ष्मी कोडम, खजिनदार – आरती बुधाराम, सहखजिनदार – विद्या सिंगम, कार्याध्यक्षा – अन्नपूर्णा सोमा, सहकार्याध्यक्षा – आरती आडम, समन्वयिका – गीता भूदत्त – कला चन्नापट्टण, मार्गदर्शिका – प्रा. सपना मिठ्ठापल्ली, सल्लागार – ममता मुदगुंडी – सीमा यलगुलवार. कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम, ॲड. मेघना मलपेद्दी, भाग्यश्री मडूर, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, विद्या श्रीगादी आणि ‘पद्मकमळ’चे रमेश कंदीकटला, जवाहर मंगलपल्ली, श्रीनिवास दुभास, आनंद दुडम, श्रद्धानंद गुंडला, दिगंबर कुरापटी, कुमार उसाकोयल, लक्ष्मीदास भंडारी, अंबादास कट्टा, गोविंद बत्तुल यांनी केले आहे.

लहानपणी शाळा सुटल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी जो धिंगाणा वायचा, ते दृष्य दुर्लभ झाल्यातच आहे, असे म्हणायला हरकत नाही. सध्याचे मुले फक्त मोबाइलमध्येच हरवतात. आणि अक्षरशः मोबाइलचे वेडे झाले आहेत. मुलांना मातीत खेळणे व विभक्त कुटूंबामुळे पूर्वीच्या खेळांचे माहिती नाहीत. हा आगळावेगळा उपक्रम पाहून सध्याच्या लहानमुलांना पूर्वीच्या खेळांमध्येच आनंद आहे, असे वाटून मोबाइलपासून दूर रहावेत. ह्या उपक्रमाचे उद्देश आहे. पूर्वी लहानपणी शाळेत ‘बालभारती’ या मराठीच्या पुस्तकात ‘लहानपण देगा देवा’ हा धडा होता. माणसाला मोठे झाल्यावर लहान व्हावेसे वाटते, लहान असल्यामुळे मोठे व्हावे, अशी भावना ह्या धडेत लेखकांने विस्तृतपणे मांडले होते. त्याची आठवण यानिमित्ताने होत आहे. काही निवडक लहानपणाचा खेळ खेळून आनंद घ्यावे. यामुळे बाल’फन’च्या जगात गेल्यासारखे वाटतो. यावेळी पालकांनीही लहान मुलांना घेऊन या उपक्रमाचा आनंद लुटावा, असे श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले.
सूचना : या उपक्रमात सहभागी होणा-या महिलांनी ‘पंजाबी ड्रेसवर’ यावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button