.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात कनोली विद्यालयाचे माजी विद्यार्थी 30 वर्षांनी एकत्र

संगमनेर प्रतिनिधी
“दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. हे नातं चिरकाळ टिकवण्यासाठी गरजेचं असतं ते सतत भेटत राहणे. याच अनुषंगाने, मा. श्री भाऊसाहेब संतूजी थोरात विद्यालय कनोली येथील १९९३ बॅच च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साजरा केला बंध मैत्रीचे २०२२ हा माजी विद्यार्थी मेळावा.
या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री शेख एफ. के. व शिक्षक श्री अरविंद कडलक, सौ. रत्नमाला डोंगरे, श्री पाटील, श्री अण्णासाहेब खुळे, श्री श्रीपत दिघे, श्री निवृत्ती डोके इत्यादी आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या सर्वांचे हे मैत्रीचे बंध आयुष्यभर असेच अखंड राहो आणि यापुढेही आपण सर्व एकमेकांच्या संपर्कात राहू आणि एकमेकांच्या सुख दुःखाचे भागीदार होऊ हीच अपेक्षा यावेळी सर्व मित्र मैत्रिणींनी व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी आयोजकांनी, सामाजिक जाणिवेतून, सर्व विदयार्थ्यांना तसेच आजी व माजी शिक्षकांना वृक्ष रोपणासाठी मैत्रीचे प्रतीक म्हणून अंजिराचे झाड भेट दिले.
याप्रसंगी, मा. श्री भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयातील मुख्याध्यापक श्री चोपडे सर, श्री के. एम. वर्पे सर व त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रिजवान शेख व सौ अर्चना वर्पे हे उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री सिताराम कृष्णाजी वर्पे हेही याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के. एम. वर्पे सरांनी केले व आभार प्रदर्शन श्री रावसाहेब वर्पे व श्री संजय वर्पे यांनी केले. या माजी विद्यार्थी मेळाव्याचे यशस्वी आयोजन १९९३ बॅच च्या सर्व विदयार्थ्यांनी केले.