मुकींदपुर ग्रामपंचायत उपसरपंच पदी गणेश माटे यांची निवड!

आबासाहेब शिरसाठ
नेवासा तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुकींदपुर ग्रामपंचायतीची उपसरपंच निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.उपसरपंच पदी श्री. गणेश अण्णासाहेब माटे. यांची बिनविरोध निवड झाली
जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची निवड प्रक्रिया पार पडली सभेचे अध्यक्ष स्थानी श्री. सतिष विष्णु पा. निपुंगे होते. व सभेचा इतिवृत्तात श्री. खंडागळे संतोष यांनी लिहुन जाहीर केला. नामदार शंकराव गडाख यांचे समर्थक जेष्ठ कार्यकर्ते श्री. पांडुरंग निपुंगे यानी मार्गदर्शन केले. सदरची निवड प्रक्रियेत सुरुवातीचे आडीज वर्षे मा. मिराबाई संजय कराडे. यांनी कामकाज सांभाळले त्यानंतर राजीनामा देऊन. श्री. अरुण आण्णासाहेब निपुंगे यांनी एक वर्ष उपसरपंच पदाचा कार्यभार पहिला सर्वांना संधी मिळावी म्हणून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त उपसरपंच पदावर श्री. गणेश अण्णासाहेब माटे. यांना संधी दिली. . सरपंच .श्री.सतिष पा. निपुंगे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री. गणेश माटे. यांचे स्वागत केले. व शुभेच्छा दिल्या. या वेळी श्री. विष्णु पा. निपुंगे ,. श्री. गंगाराम पा. निपुंगे. सदस्य.श्री.बाबासाहेब साळवे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष. श्री. लक्ष्मण कराडे. श्री. अशोक निपुंगे. श्री. सिताराम निपुंगे. श्री. बाबासाहेब शेलार. सामाजिक कार्यकर्ते. . . कैलास निपुंगे ,संजय निपुंगे, माजी उपसरपंच अशोक निपुंगे. दिगंबर निपुंगे. राजेंद्र कराडे. संजय लिपाने. सुनिल सवई. गोटु पडुळे. भैय्या मते. अमजदभाई. जनाभाऊकराडे. शंकर डोईफोडे. बाळु लिपाने. भैय्या डावखर. पप्पुशेट हांडे.पठाण मिस्त्री. राजु निपुंगे. लक्ष्मण निपुंगे. महेश निपुंगे. निलेश निपुंगे. गोटु हांडे. कर्डक भाऊसाहेब.राजु इंगळे. शुंभम शेलार. पोलीसपाटील आदेश साठे. अनिल डावखर. आण्णा घोलप. तलाठी भाऊसाहेब दिघे. ग्रामसेवक संतोष खंडागळे. श्रीधर ताकवले. रुषी बोरुडे. अमोल कनगरे. नितिन मंडलिक संतोष साळवे. मल्हारी शिंदे. नंदु वाकडे. केशव महानोर. पंकज साळवे. ज्ञानेश्वर देवकाते. अशिष मते. विजु कांबळे. विशाल तिवारी, व सर्व ग्रामपंचायत सदस्य.कर्मचारी . कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.