कोतुळ- तोलारखिंड रस्त्यावर रोलर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील संगमनेर- कोतुळ- तोलारखिंड या रस्त्यावर रोलर अपघाताची घटना घडली कोतुळ तोलार खिंड रस्ता सुधारणे चे काम सुरू असताना रोलर पलटी झाल्याने या रोलर खाली दबून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली
बिरंदर कुमार भागीरथ मिस्त्री वय 47वर्ष धंदा-जेसीबी मषीन ऑपरेटर रा-मस्केडीह ता-चलकुसा जि. हजारीबाग (बरकथा झारखंड) ह. रॉ- निमगाव पागा ता- संगमनेर जि.अ.नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन अ.मृ रजि नं 102/2023सी आर पी सी 174प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
रामदेव गाजोमिस्त्री वय 48वर्ष रा-मस्केडीह ता-चलकुसा जि. हजारीबाग (बरकथा झारखंड) या रोलर चालकाचा या अपघात मृत्यू झाला
रस्त्याचे काम सुरू असताना रोड रोलर मागे घेताना रस्त्याचे कडेला पलटी
होवुन चालक मयत झाला .पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करुन पुढील तपास पोना अनिल जाधव हे करीत आहे.