नगर -औरंगाबाद रोड वर नेवासा फाटा येथे लॉजवर छापा , वेश्या व्यवसाय रॅकेटचा फर्दाफ़ाश !

दत्तात्रय शिंदे
नगर -औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे असलेल्या तीन लॉजवर छापा टाकत पोलिसांनी वेश्या
व्यवसायाच्या रॅकेटचा फर्दाफ़ाश केला आहे
शेवंगाव उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा फर्दाफ़ाश केला . या छापेमारीत पोलिसांनी सात महिलांची सुटका केली
आहे. नेवासा फाट्यावरील तीन प्रतिष्ठित लॉजिंग वर पोलिसांची छापा टाकला यात सात महिलांसह पुरुषांना अटक करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते
नेवासा फाटा परिसरात लॉजिंग व्यवसाय मोठया प्रमाणात वाढला आहे या लॉजिग वर अनैतिक शारीरिक वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारेही कारवाई केली
या लॉजवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवला होता. असता या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी लॉज वरील महिला व पुरुषांना ताब्यात घेतले यातून सात महिलांची सुटका केली .
सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवंगाव उपविभागीय अधिकारी संदीप मिटके नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे, सोनई पोलीस ठाण्याचे माणिकराव चोधरी यांच्या सह
श्रीरामपूर, राहुरी येथील पोलीस निरीक्षक व सुमारे २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता.
हॉटेल तिरंगा येथून तीन मुली, हॉटेल नामगंगा येथून तीन मुली तर हॉटेल पायल मधून एका मुलीला ताब्यात घेण्यात आले तसेच या छाप्यातील महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात येणार आहे लॉज मॅनेजर व मालक याच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा पोलिसांनी दिली