भगवान बुद्ध यांचा शांतीचा संदेश देणारे अश्वजीत यांनी धम्मदेशना दिली

डॉ शाम जाधव
सांगली आज दिनांक २१/११/२०२४ रोजी महाकारुनी तथागत गौतम बुद्ध त्यानंतर महाथेरो डॉक्टर यशकाश्यपायन यांनी भगवान बुद्धांची खालील गाथा अश्वजीत यांनी म्हटली आहे त्या गाथेने धम्मदेशना देण्यास सुरुवात केली,”ये धम्म हेतुप भवा, हेतू तेसंच तथागतो आहं ! ते संचयो निरोधो एवं वा दि महासमनोनी!”
महावगग विनय पिटक :
“जगात जेवढे काही धर्म म्हणजेच (धर्माची व्याख्या स्वभाव प्रवृत्ती आणि मग या सर्वांना इथे धर्म म्हटलेले आहे.) याचा उद्भभव होणे अर्थात करणा शिवाय ते उत्पन्न होत नाही. येथे चित्त, मन, स्वभाव प्रति यांच्या अभ्यास गृहीत धरावा लागतो. ते उत्पन्न होण्यास कारणे आहेत. ही सर्व करणे तथागत जाणतात. त्याचप्रमाणे ही कारणे समाप्त करण्याचा मार्ग सुद्धा तथागत जाणतात. जेव्हा ही करणे समाप्त होतात ज्या वेळी अकुशल चित्त, स्वभाव, प्रवृत्ती, मन उत्पन्न होत नाही. त्यावेळी सदर व्यक्ती सर्व तृष्णेतून मुक्त होऊन परम माणुसकीला अर्थात निब्बाणास प्राप्त होतो. हाच भगवान बुद्धांचा मार्ग आहे.”

भगवान बुद्ध हे अतिशय आगळे वेगळे आहेत. जगामध्ये त्याच्या सारखे कोणीही नाही. आणि ते मानवी किंवा समग्र सृष्टीच्या अतिशय हिताचे व सुखाचे मार्गदर्शक आहेत. भगवान बुद्धांनी जितके शाश्वत दुःखाचे स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच भगवान बुद्धांनी जितके परम सुखाचे स्पष्टीकरण केलेले आहे ते ही तात्काळ सुखा बाबतस्पष्टीकरण बुद्धाशिवाय कोणीही केलेले नाही. भगवान बुद्धांनी असे का केले असेल ?
उत्तर सरळ आहे, मानवी जीवन अतिशय दुःखाने ग्रासलेले आहे. तेव्हा मनुष्यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधणारच. परंतु त्याला तो मार्ग दिसत नाही. कारण अनेक वर्षापासून त्याच्या मनावर झालेले अकुशल संस्कार यालाच मानव समाज सुखाचा मार्ग मानतो. त्यापैकी एक आहे ईश्वराची आराधना !
मानवी विश्वासास मानव वंशशास्त्र प्रमाणे अभ्यास केला तर मानव हा अंदाजे तीन लाख वर्षांपूर्वी पासूनचे आहे. मानवाला अग्नीचा शोध २०००० वर्षांपूर्वी लागला. मानवाने वस्त्राचा शोध १०००० वर्षांपूर्वी लावला. लोखंडाचा शोध हा ६००० वर्षांपूर्वीचा असेल यावरून मानवी सत्यता हळूहळू विकसित होत आहे.

दहा हजार वर्षे हा फार मोठा काळ आहे.
आदिमानव आकाशात कडाडणाऱ्या विजा, महापूर, भयंकर दुष्काळ, घनदाट अरण्यातील खोल गुहा/गुंफा या सर्वांना बघून आश्चर्यचकीत किंवा अति घाबरून जायचा .इथूनच धर्माची सुरुवात होते.
काही काळानंतर मानव विचार करू लागला ,हे सर्व काही घडणाऱ्या घटना बघून या सर्व घटनांना घडवून आणणारी कोणतीतरी चमत्कारी जादू सारखी शक्ती असेल आणि ती आपणास प्राप्त झाली पाहिजे, इथूनच ईश्वराची संकल्पना सुरू होते. या त्याच्या मनाच्या समजूतिचा फायदा घेऊन त्या मानवातील काही व्यक्ती म्हणून लागली की, ईश्वर आहे . याचा बऱ्याचशा लोकांनी फसवणूक करून याचा फायदा घेतलेला आहे.
परंतु तो आधी मानव आजच्या आधुनिक मानव त्या ईश्वराला शोधणार कोठे ? त्याला दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसे पृथ्वी, समुद्र, विशाल चमकणारा सूर्य ,चंद्र आणि काही ग्रह तारे तसेच वेगाने वाहणारा वारा आणि आकाश या सर्व वस्तूंना बघून तो आधी मानव व आजचा व आजचा आधुनिक मानव या सर्व वस्तूंना आजच्याट शक्ती मानतो. आणि ते खरे सुद्धा आहे. वरील सर्व भौतिक पदार्थ अचाट शक्तीचे भंडार आहे आणि कदाचित ते अविनाशी सुद्धा असेल, म्हणून मनुष्य या शक्तीला ईश्वर आहे असे मानतो. आपण या शक्तींना आपण या शक्तीचा गंभीर अभ्यास केला तर त्या भौतिक पदार्थात अमर्यादित अशी शक्ती आहे, हे खरे आहे. परंतु हेही सत्य आहे की, भौतिक पदार्थाने कोणतीही सजीव सृष्टी निर्माण केलेली नाही. परंतु सर्व सजीव सृष्टी या भौतिक पदार्थातूनच निर्माण झालेली आहे.
जीवशास्त्रीय प्रमाणे वरील चार भौतिक पदार्थांना सजीव ही सज्ञा वापरली जात नाही. त्या या भौतिक पदार्थांना निर्जीवच मानतात. कारण हे भौतिक पदार्थ स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत किंवा आपली गतीही बदलू शकत नाहीत ते कोणाचे शब्दही ऐकू शकत नाही किंवा कोणाच्या भावनाही जाणू शकत नाही कारण त्यांना सजीवांचे अवयव नाहीत. माती ,पाणी ,पाऊस आग, यांना कान,डोळे, जीभ, हृदय, हात पाय हे काहीच नाही. त्यामुळे आपण सूर्य चंद्र पाणी आकाश पाऊस याच्यापुढे जन्मभर जरी आराधना करून डोके आपटले तरी ते आपल्या मदतीला जाऊन येणार नाहीत .कारण त्या पदार्थाच्या संयुगाने आपण निर्माण झालेलो आहोत.
म्हणून या अर्थाने बघितले तर विश्वामध्ये ईश्वर आहे याला कोणीही नाकारू शकत नाही .तो आहे च कारण या भौतिक पदार्थांना ईश्वर म्हणणे सिद्ध होते. यावरून ईश्वरामध्ये आचाट शक्ती असून सुद्धा तो मानवी सृष्टीच्या व समस्त जीवसृष्टीच्या दृष्टीने वरील प्रकारचा ईश्वर निष्क्रिय आहे.
कारण त्याला अवयव नसल्याकारणाने दया, प्रेम, क्रोध या सर्व भावना त्यांच्यामध्ये नाहीत. म्हणूनच तो मानवी हिताच्या दृष्टीने कधीही उपयोगी नाही. कारण आपणास वरील प्रकारच्या चार भौतिक पदार्थाने कधीही निर्माण केलेले नाही. परंतु हे मात्र खरे आहे की, संपूर्ण मानव सृष्टी आणि सर्व वैश्विक सृष्टी याच निर्जीव पदार्थातूनच विकसित होत आहे. ही प्रक्रिया अब्जावली काळापासून ते अब्जावधी काळापर्यंत अखंड व सतत पणे चालणारी प्रक्रिया आहे. त्याने निर्माण केले आणि त्या पदार्थापासून आपण विकसित होत आहोत हा भाषेचा फरक जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर मानवाला अनंत सुखाच्या प्राप्तीसाठी निर्मळ बुद्धी, सदाचार, परम मानवता हाच मार्ग स्वीकारावा लागेल, तेव्हाच मानवाचे अमर्यादकाळापर्यंत सुखाचा प्रवाह सुरू राहील. यालाच बुद्ध ज्ञान असे म्हणतात. अशा प्रकारे धम्मदेशना संपवून धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. त्यादरम्यान सांगली विधानसभेच्या उमेदवार श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांनी विहारामध्ये भेट देऊन आमदार पदासाठी उभे असून त्यांचे चिन्ह हिरा आहे आणि बहुमोल देणे बाबत सर्वांना विनंती केली त्याचप्रमाणे आदरणीय मदन भाऊ हे या विहारात बऱ्याच वेळा पायाभरणी उद्घाटन तसेच इमारत उद्घाटन व २००६ रोजी झालेल्या धम्म परिषदेत उपस्थित राहून सहकार्य केले होते. याचीही त्यांनी आठवण करून दिली.