अकोले तालुक्यात धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी भात आणावा – माजी आमदार वैभव पिचड

अकोले प्रतिनिधी
– महाविकास आघाडीच्या काळात आदिवासी भागात धान खरेदी केंद्र बंद असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना भाताला योग्य भाव मिळत नव्हते.व्यापारी त्यांच्या कडून कमी किमतीत भात खरेदी करीत असे त्यामुळे या आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही परिस्थिती त्यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दि.26 नोव्हेंबर 2020, दि.11 ऑक्टोबर 2021,दि.27 जानेवारी 2022 रोजी, दि.15 मे 2022 रोजी वेळोवेळी मा.आदिवासी विकास मंत्री, मा.आयुक्त, आदिवासी विकास विभाग,मा.सचिव, आदिवासी विकास भाग यांना पत्र पाठवून तसेच फोन द्वारे धान खरेदी केंद्र सुरु करण्याविषयी पाठपुरावा केला होता.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही मात्र शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यावर आदिवासी विकास विभागाने कार्यवाही करुन अकोले तालुक्यात राजूर व कोतुळ येथे धान खरेदी केंद्र सुरू केले आहे.
या धान खरेदी केंद्रामुळे आदिवासी शेतकऱ्यांना भाताला 2000 रुपयांचे पुढे क्विंटल ने भाव मिळणार आहे.त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.त्यामुळे या धान खरेदी केंद्रावर आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आपला भात आणावा असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे
——