इतर

महाराष्ट्र क्रिकेट संघात संगमनेरची श्रेया शिंदे हिची निवड

संगमनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या १५ वर्षातील मुलींच्या महाराष्ट्र संघाची घोषणा झाली या संघात संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया सुनील शिंदे हिची उत्तम .
डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणून महाराष्ट्र संघात निवड झाली .

पुढील बीसीसीआय आयोजित १५ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ जाहीर झाला असून सदर संघ २१ ते २९ नोव्हेंबर ओडीसा येथे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

कुमारी श्रेया शिंदे हिला तिच्या वडिलांच्या असलेल्या क्रिकेटच्या आवडीमुळे श्रेयाला वडिलांकडून क्रिकेट खेळण्याची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले व त्यामुळे तिची क्रिकेट खेळा संदर्भात आवड निर्माण झाली.

श्रेयाचे वडील श्री सुनील व आई सौ अश्विनी शिंदे या दोघांनीही या आपल्या मुलीच्या स्वप्न पूर्ततेसाठी अनेक दिवसापासून श्रम घेतले क्रिकेटच्या प्रॅक्टिस करीता दोघेही आई-वडील संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब ग्राउंडवर दिवसातून सहा ते सात तास प्रशिक्षण देत होते व या सर्व निवडीचे श्रेय शिंदे कुटुंबाने मालपाणी हेल्थ क्लबचे डायरेक्ट श्री गिरीश भाऊ मालपाणी व मालपाणी परिवाराचे विशेष आभार मानले आहे.

या निवडीकरीता मोलाचे.
सहकार्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री संतोषजी बोबडे सर, परभणी जिल्ह्याचे प्रशिक्षक श्री बोरफळे सर ,सुहास पावडे सर यांचे मार्गदर्शन मिळाले . कुमारी श्रेया ही सध्या परभणी जिल्ह्याकडून खेळत असून डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणून तिची निवड झाली आहे.
श्रेयाला या यशापर्यंत पोहोचविण्यासाठी तिचे मुख्य प्रशिक्षक श्री योगेश खरात सर सहशिक्षक अदिप वाघ सर, अभिषेक कदम सर ,व श्री प्रथमेश हसे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले .श्रेयाच्या या निवडीबद्दल मा. आ. बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब गुंजाळ
पाटील सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे मा. आ. सत्यजीत दादा ताबें,मा. संजयजी मालपाणी, मुख्याध्यापक श्री खेमनर सर , नगरसेवक किशोर पवार,व जानकीनगर रहिवासी व सुनील शिंदे मित्र मंडळाच्या वतीने तसेच संगमनेर क्रीडा रसिकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button