अँड .देशमुख महाविद्यालया च्या कुस्ती सेंटरला उपविदर्भ केसरी ‘किताब!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल वर्धा (देवळी) येथे पार पडलेल्या 36 वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत राजूर येथील अँड .मनोहरराव नानासाहेब देशमुख महाविद्यालया मध्ये प्रथम वर्ष कला या वर्गात शिकत असलेला पैलवान हाराळ सुदर्शन दत्तराव याने फायनल कुस्ती मध्ये मजल मारून उपविदर्भ केसरी ‘किताब मिळवला
ही विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा वर्धा जिल्ह्याचे खासदार श्री रामदासजी तडस यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आल्या होत्या ,या स्पर्धेसाठी प्रमखु पाहुणे केंद्रीय मंत्री श्री सुभाष सरकार दिल्ली व महाराष्ट्र राज्याचे मा .मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते ,स्पर्ध दरम्यान उप विदर्भ केसरी ‘किताब ठरलेला पैलवान सुदर्शन हाराळ यास मेडल्स व प्रमाणपत्र व 41,000 रुपये देऊन गौरवन्यात आले व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या ,
तसेच या पैलवानास महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षक विभाग प्रमुख प्रा. नवले व्ही. बी. व अँड. एम.एन.देशमुख महाविद्यालय साई कुस्ती सेंटरचे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते श्री. तानाजी नरके सर यांनी मार्गदर्शन केले .
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी .वाय .देशमुख , तसेच सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष माननीय अँड.एम.एन .देशमुख
.टी.एन.कानवडे(सचिव सत्यनिकेतन संस्था), मिलिंद उमराणी , .विवेक मदन (कोषाध्यक्ष)या सर्वांनी पैलवान सुदर्शन याचे अभिनंदन केले
