अरविंद गाडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार प्रदान.

संगमनेर प्रतिनिधी-
संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार माननीय सुधीर लंके ( निवासी संपादक, दैनिक लोकमत,अहिल्यानगर) यांच्या हस्ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. राहुल हांडे (प्रसिद्ध लेखक) व व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
अरविंद गाडेकर यांनी सामाजिक एकता, जातीय सलोखा, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, मोबाईलचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा गैरवापर, सायबर फ्रॉड, भ्रष्टाचार, नागरी समस्या अशा अनेक विषयावर शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन व्यंगाचित्रांचे सादरीकरण व व्यंगचित्राचे प्रदर्शनाद्वारे जनप्रबोधन केले आहे. त्यांनी आतापर्यंत 12000 व्यंगचित्र साकारले असून 11000 व्यंगचित्र साकारल्याबद्दल महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून इतिहासकालीन व कर्तृत्ववान पुरुष, महिलांचे कार्य, माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात त्यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

त्यांच्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. याच कार्यक्रमात अफसर बालम तांबोळी , डॉ.सलीम सिकंदर शेख, शहानवाज गणी शाहा यांना राज्यस्तरीय पुरस्कार माननीय सुधीर लंके साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास संगमनेरकरांनी गर्दी केली होती. हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्याकरिता एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख आणि त्यांच्या संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले आहे. या कार्यक्रमास संगमनेरकरांनी गर्दी केली होती.