
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुरशेत येथे नवरा बायकोच्या भांडणात बायकोला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या प्रकरणी राजूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुरशेत येथील संजय बांगर हा आपली बायको शोभा (वय ३०) हिच्यासह त्रिंगलवाडी (ता. इगतपुरी) येथे सासुरवाडीस गेला होता. तेथे शोभाहिची मुक्कामी थांबण्याची इच्छा होती. तर संजय बांगर हा मुक्कामी थांबण्यास इच्छुक नव्हता, त्यावेळी शोभा व संजय यांच्यात जोरदार भांडण झाले. अशा परिस्थितीत संजय वशोभा रात्री साडेआठ वाजता मुरशेत येथे जाण्यास निघाले. रस्त्यातच परदेशवाडी पुलाजवळ पुन्हा त्यांच्यात भांडण झाले वसंजय बांगर याच्या हाणामारीत शोभा हिचा मृत्यू झाला. सदर मृतदेह हा जागेवरच सोडून तो मुरशेत येथे निघून आल्यानंतर एकाची गाडी घेत मृतदेह परत मुरशेत येथे आणला.दुसऱ्या दिवशी शोभाच्या माहेरी शोभा ही गाडीवरुन पडल्याने मयत झाल्याची माहिती तिच्या माहेच्यांना सांगितली. त्यानंतर माहेरच्यांनी मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. तेथे मृतदेहाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने हा प्रकार घातपाताचाअसल्याचे लक्षात आले. त्यावरुन मयत शोभाचा भाऊ त्रिंबक रामदास गोंदके याने राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुनपोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी पती संजय बांगर याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या अधिपत्याखाली पोलिसउपनिरीक्षक नितीन खैरनार, पोना.विजय फटांगरे, साईनाथ वर्षे, देविदास भडकवाड व इतर करत आहेत.———-