अहमदनगरकृषी

आदिवासींनी पारंपारिक भातशेतीच्या मानसिकतेतून बाहेर यावे आमदार डॉ किरण लहामटे

अकोले, प्रतिनिधी

कृषिविषयक विकासकामांवर आदिवासी भागांतून मोठे काम करता येईल एवढे पोटेन्शियल अकोले तालुक्यात आहे. आदिवासी भागातील बहुतांश शेतकरी पारंपारिक भातशेतीसोबतच आता नवनवीन पीक पद्धती विकसित करीत आहेत. कृषि उत्पन्नात वाढ होईल असे जिरे, काळी मिरी, जिरेनियम, काजू, निळा भात, फूलशेती, मेथी, पालक, टोमॅटो, सोयाबीन व वेलवर्गीय भाज्या पिकवून बागायत शेती करू लागले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना फक्त भातशेती एके भातशेतीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यास कृषि विभागाला यश मिळताना दिसत आहे. याचे खरे श्रेय शेतकऱ्यांसह तालुका कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यकांकडे जाते. अकोले तालुक्यात सुरेश पोखरकर हे कृषि पर्यवेक्षक म्हणून कौतुकास्पद काम करून गौरवास पात्र ठरले आहे. सुरेश पोखरकर यांच्याकडून शेतकऱ्यांची झालेली सेवा खरोखरच वाखाणण्याजोगी व संस्मरणीय अनुभव आहेत, असे गौरवोद्गार अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले. 

     महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातून पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते अकोल्यातील अंबिका मंगल कार्यालयात सुरेश पोखरकर व सौ.ज्योती पोखरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. लहामटे या सेवा पूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक तथा अगस्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर हे होते. व्यासपीठावर उपस्थित अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य काॅम्रेड कारभारी उगले, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मीनानाथ पांडे, जि.प.चे भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, संगमनेर येथील तालुका कृषि अधिकारी प्रवीण गोसावी यांची सुरेश पोखरकर यांच्या गौरवपर भाषणे झाली. सूत्रसंचालन पत्रकार अमोल वैद्य व अगस्ति साखर कारखान्याचे मुख्य ऊस व्यवस्थापक अधिकारी सयाजीराव पोखरकर यांनी केले. प्रास्ताविकातून आत्माचे समन्वयक बाळनाथ सोनवणे यांनी पोखरकर परिवाराच्या प्रगतीचा आढावा घेऊन परिचय करून दिला.

    व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जि.प. सदस्या सुनिता भांगरे, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक प्रकाश मालुंजकर, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, अशोकराव देशमुख, अशोकराव आरोटे, भानुदास तिकांडे, भाऊपाटील नवले, सतीश नाईकवाडी, शिरीष नाईकवाडी, संपतराव नाईकवाडी, बाळासाहेब नाईकवाडी, मंदाबाई नवले, प्राध्यापक मा.ल.वाकचौरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारूती मेंगाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश नवले, नगरसेवक शितल अमोल वैद्य, नवनाथ शेटे, आरीफ शेख, अॅड सदानंद पोखरकर उपस्थित होते. 

   यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर म्हणाले, पाठीशी कोणत्याच व्यवसायिक पार्श्वभूमी नसतानादेखील स्वतःची शेती करून हाॅटेल, फोटोग्राफी, किराणा व कापड दुकानांचा व्यवसाय करीत आपल्या सहाही मुलांना उत्तम शिक्षणाबरोबरच संस्कार देऊन काशिनाथ पोखरकर यांनी समाजासमोर दिशादर्शक आदर्श निर्माण केला. पोखरकर कुटुंबात सून म्हणून माझी बहिण दिल्यापासून या कुटुंबीयांसमवेत सातत्यपूर्ण आलेले सबंध नेहमीच प्रेरणादायी आहेत. सामाजिक बांधिलकी जपलेले कुटुंब म्हणून अकोले तालुक्यातील कोतूळ येथील जुन्या पिढीतील काशिनाथ पोखरकर यांच्या कुटुंबाकडे पाहीले जाते. त्याच्या सहा मुलांना वेगवेगळ्या फॅकल्टीतून शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले. सर्व सुना पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहेत. या सर्वांचे आपापल्या क्षेत्रातील काम नेत्रदीपक व प्रामाणिकपणावर आधारित आहे. आपले सामाजिक उत्तरदायित्व स्विकारून ते तालुक्यासमोर दिपस्तंभासारखे उभे आहे. कृषि खात्यात सुरेश पोखरकर यांनी सुरूवातीला कृषि सहाय्यक व नंतर पर्यवेक्षक म्हणून केलेली विकासकामे शेतकऱ्यांना  अतिशय उपयुक्त ठरली असून दर्जेदार व संस्मरणीय आहेत. या कुटुंबीयांचा आदर्श प्रभावी व मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन कृषि पर्यवेक्षक सुरेश पोखरकर सेवा पूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी केले. 

   कार्यक्रमास वीरगाव येथील कृषीतज्ज्ञ अनिल देशमुख, अॅड अनिल आरोटे, चंद्रकांत पोखरकर, अनिल कोळपकर, अगस्ति शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शैलजा पोखरकर, सुलभा पोखरकर, प्रकाश देशमुख, विजय पोखरकर, शोभा पोखरकर, स्वप्नील पोखरकर, मधुकर बिबवे, ए.के.हासे, प्रशांत दहिवाळ, सुरेश कोकणे, किशोर अवसरे, हेमंत मोरे, क्षीरसागर, मंडल कृषि अधिकारी आर. व्ही. गायकवाड, बांबळे, वायळ, रोकडे, बिबवे, आर.डी. साबळे, सर्व कृषि सहाय्यक व पर्यवेक्षक, अकोले आगार सहाय्यक बाळासाहेब गंभिरे, के.बी.चौहान, घोडके, दिलीप कडलग, अशोक फाफाळे, अशोक कडलग, छापेकर, डहाके, लक्ष्मण मेंगाळ, मोहीळे, चालक वाहक तसेच तळे, शिंदे, विहीर, सांगवी, एकदरे,खिरविरे येथील शेतकरी उपस्थित होते. शेवटी जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य शाखेतील निवृत्त व्यवस्थापक भानुदास पोखरकर यांनी आभार मानले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button