भारतीय संविधान दिनानिमित्त धामणी मधील आरोग्य कामगारांचा गौरव…

डॉ शाम जाधव
सांगली-२६ नोहेंबर भारतीय संविधान दिानिमित्त मिरज तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत मधील आरोग्य शेत्रतात सक्रिय काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचा त्यामधे प्रमुखाने आशा वर्कर्स,आरोग्य केंद्रामधील तसेच ग्रामपंचायत मधील सफाई कर्मचारी यांचा संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. उमरफारूक ककमरी आणि कामगार कार्यालयातील अधिकारी मा. जयदीप पाटील साहेब परिविक्षाधीन सहाय्यक कामगार आयुक्त व दिनेश पाटोळे साहेब सरकारी कामगार अधिकारी यांच्या प्रमूख उपस्थित त्यांनी केलेल्या कामाचा गर्व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले

त्यावेळेस अनेक आरोग्य सेवक उपस्थित होते त्यांनी स्वतःची अनुभव आणि व्यथा संघटनेच्या समोर तथा कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समोर मांडली त्यावेळेस सेवक कामगार संघटनेच्या वतीने त्यांना आश्वासन देण्यात आले की आपला कोणताही विषय असो त्याला संविधानिक मार्गाने न्याय मिळवून दिवसपर्यंत संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील त्यामुळे तेथील आरोग्य सेवकांनी तसेच मा. जयदीप पाटील साहेब व मा. दिनेश पाटोळे साहेब यांनी सुद्धा सेवक कामगार संघटने कडून आयोजित करण्यात आलेल्या गौरव पुरस्कार कार्यक्रमाचा कौतुक केले
तसेच त्यांनी संघटनेच्या व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्यावर सहकार्य करून मदत करण्याची ग्वाही दिली त्यावेळेस सांगली जिल्हाध्यक्ष देविदास हावळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम,मिरज शहराध्यक्ष बाशा बागवान, स्थानिक वरिष्ठ सामाजिक सेवक वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, मानतेश कांबळे, निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डनावर तसेच अनेक आरोग्य सेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
