अजित दादा पवार, बाळासाहेब थोरात, खासदार लोखंडे शुक्रवारी अकोल्यात!

अकोले प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे शुक्रवारी दि 15 जुलै रोजी अकोल्यात येत आहे
शेतकरी समृद्धी मंडळाच्या निवडणूक प्रचारासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री विठ्ठल लॉन्स देवठाण रोड अकोले येथे त्यांची ही प्रचार सभा होत आहे
अगस्ती कारखाना निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळ आणि आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे ,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन जेष्ठ नेते सीताराम पाटील गायकर, काँग्रेस चे मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, शेतकरी नेते डॉ अजित नवले यांचे नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यात दुरंगी लढत होत आहे. अकोल्याच्या विकास कामांत मोलाची साथ देणारे अजित दादा पवार अकोल्यात येत आहे दोन्ही बाजूच्या प्रचार शिगेला पोहचला आहे अशा वातावरणात अजितदादा काय राजकीय फटकेबाजी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे