डॉक्टर दिना निम्मिताने ,डॉ.संदिप गाडे यांचा आमदार लंके यांनी केला सन्मान !

पारनेर प्रतिनिधी
“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा”
या उक्ती प्रमाणे रुग्णांमध्ये देव शोधणारे अनेक डॉक्टर आज सामाजिक बांधिलकी जतन करत रुग्ण सेवा देत असतात त्यापैकीच एक असणारे डॉक्टर संदीप गाडे .
कोरोना विषाणूच्या जैविक महामारी मध्ये आपल्या व्यवसायाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत शेकडो कोरोना रुग्णांची सेवा करत त्यांना जीवदान दिले
.ज्यावेळेस भाळवणी येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या नावाने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांनी एक हजार दोनशे बेडचे सुसज्ज असे मोफत कोविड सेंटर सुरू केले व त्यामध्ये किमान 36000 रुग्णांना रुग्ण सेवा मोफत उपलब्ध करून दिली .
त्यावेळेस गंभीर रुग्णांसाठी आमदार निलेश लंके यांच्या हाकेला साद देत डॉक्टर संदीप गाडे यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले .
आज डॉक्टरदिन संपूर्ण देशात साजरा होत असताना आमदार लंके यांनी मतदारसंघातील अनेक डॉक्टरांचा सन्मान केला त्यापैकी एक असणारे संदीप गाडे यांच्या इम्पल्स हॉस्पिटलला जात त्यांना डॉक्टर दिनाच्या निमित्ताने यशोचित सत्कार करत सन्मानित केले .