तिर्थाचीवाडी येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन.

अकोले प्रतिनिधी
सूर म्हणतात साथ द्या,दिवा म्हणतो वात द्या,आमच्या चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिर्थाचीवाडी येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा सन २०२४ या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
हस्ताक्षर,वक्तृत्व व वेशभूषा सादरीकरण किलबिल गट व बालगट गोष्ट सादरीकरण स्पर्धा बाल गटात घेण्यात आल्या.तसेच वैयक्तिक गीत,समूहगीत गायन आणि सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत बालगट आणि किलबिल गट यांच्या संयुक्तपणे स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी केंद्रशाळा खिरविरे अंतर्गत येणाऱ्या खिरविरे तिर्थाचीवाडी कारवाडी, चोमदेवाडी,धारवाडी,मानमोडी,
इदेवाडी,एकदरे, कारवाडी,जायनावाडी,चंदगिरीवाडी व बिताका यासारख्या अनेक शाळांनी येऊन या ठिकाणी अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये मार्गदर्शक म्हणून खिरविरे बिटचे शिक्षण विस्तारआधिकारी संभाजी झावरे व तसेच खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुरळीतपणे आणि शांततामय वातावरणामध्ये स्पर्धा पार पडल्या.
प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित खिरविरे गावचे सरपंच गणपत डगळे,दादभाऊ बेनके,पालक वर्ग, व सर्व शाळेमधील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.