डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डी विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी महाविद्यालयात विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेंचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
देशात नवनवीन संशोधन होणे ही या विज्ञानाच्या युगात काळाची गरज आहे……. आणि यासाठी पुढे जाऊन भारत देशाचे नेतृत्त्व करणाऱ्या लहान लहान संशोधकांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. याच संशोधनात्मक प्रोत्साहनाचा एक टप्पा म्हणजे अविष्कार स्पर्धा..
राज्यपाल भवन महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबवलेल्या या उपक्रमामधून नक्कीच छोट्या छोट्या पण उदयाच्या मोठ्या संशोधकांना चालना मिळेल. उत्तम नियोजन, पारदर्शकपणा आणि खरेपणा या तीन गोष्टींमुळे सा. फुले पुणे विद्यापीठाने सलग पाच वर्ष विभागीय स्पर्धा आयोजनाची संधी महाविद्यालयाला दिली.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून सी . टी . बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य मा . डॉ . के . सी . मोहिते , मा . डॉ . धीरज अग्रवाल प्राचार्य मा.डॉ. रणजीत पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन उपस्थित होते..सक्षम युवाशक्तीला देशाचे नेतृत्व करण्यासाठी संशोधनात्मक ध्येय धोरणांनी पुढे आणावे लागेल.. नवीन पिढीला संशोधनात संधी मिळाली पाहिजे यासाठी आविष्कार सारख्या स्पर्धांची आवश्यकता आहे असे मत मा . प्राचार्य डॉ .के . सी . मोहीते यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
संशोधन हा विकासाचा गाभा आहे

. नवीन तरुण पिढीमधे संशोधन वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने अविष्कार सारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या विभागीय आविष्कार स्पर्धा परीक्षक म्हणून सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या प्रमूख मा . डॉ .शामला मॅडम , मानववंश शास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख मा .डॉ . राम गंभीर , मानसशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख मा . डॉ . शेजवळ सर डॉ . डी . वाय . पाटील पिंपरी महाविदयालयाचे वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख मा . डॉ . किशोर निकम , डॉ . डी . वाय . पाटील महाविद्यालय पिंपरी च्या संगणकशास्त्र विभाग प्रमूख मा . डॉ . सुजाता पाटील उपस्थित होते. पुणे जिल्हयातील विविध महाविद्यालयामधून एकूण २६० प्रोजेक्ट सह ५७० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या विभागीय पातळीवर निवड केलेले प्रोजेक्ट विद्यापीठस्तरावर सादर केले जातील..
सदर उपक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील मॅडम, सचिव मा.डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ.मोहन वामन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
उपक्रमाच्या आयोजनात डॉ. मुकेश तिवारी, ए आर सी प्रा. अर्चना ठुबे , प्रा . अर्चना चौधरी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.