सौंदाळा गावी पशुधन व्यवस्थापन शिबिराचे आयोजन..

माका प्रतिनिधी
भेंडा ( ता.नेवासा ) येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय,ज्ञानेश्वरनगर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर स्थापना दिनानिमित्त डॉ.पंडित नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०४/१२/२०२४ रोजी मौजे सौंदाळा येथे पशुपालक श्री.सुधीर आरगडे यांच्या गायींच्या गोठयात युवा शेतकरी व विद्यार्थ्यांना पशुजनगणना मार्गदर्शन करतानी नेवासा तालुका पशु विकास विस्तार अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांनी पशुगणना महत्व, कार्यपद्धती, फायदे याविषयी सविस्तर चर्चा गोपालकांना दिली. सदर कार्यक्रमास परिसरातील शेतकरी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोपान मते यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे डॉ.शरद शिंदे, डॉ. सोनवणे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.