मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेसाठी केला : सभापती काशिनाथ दाते सर

कासारे ते कर्जुले हरेश्वर रस्ता मुरमीकरण कामाचे भूमीपूजन
पारनेर प्रतिनिधी
कासारे ता. पारनेर येथे जिल्हा परिषद सेस अंतर्गत कासारे ते कर्जुले हरेश्वर रस्ता मुरमीकरण करणे – ४ लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भाई भोसले, पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, विभाग प्रमुख सुभाष ठाणगे सर, शेतकरी तालुका प्रमुख कैलास न-हे, उप तालुकाप्रमुख सुनिता मुळे,कर्जुले हरेश्वर सरपंच संजीवनी आंधळे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते म्हणाले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणावे लागणार आहे. या कामाच्या निमित्ताने पुन्हा गावात येता आले. तुम्ही सुचवलेली सर्व कामे आपण मार्गी लावणार आहोत, काळजी करू नका. कामे होत राहतात परंतु कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केले असून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या कामावर खुश आहे. कासारे गाव माझ्या प्रेमाचे आहे, माझे नातेसंबंध या गावात आहे, या गावाने मला कायमच भरभरून दिले आहे. सर्व सामान्य शिवसैनिक जागेवरच आहे पक्षाबरोबर आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता येणार असून आगामी निवडणुकीत शिवसेना कोठेही कमी पडणार नाही असे मत सभापती दाते यांनी व्यक्त केले. मिळालेल्या संधीचा आपण पुरेपूर उपयोग सामान्य लोकांच्या प्राथमिक गरजा वीज, आरोग्य, रस्ता पूर्ण करण्यासाठी केलेला आहे. कोण काय काम करते, लोकांना माहित आहे. वास्तव सगळं समोर आहे परिस्थिती बदलत असते. तुम्ही सांगितलेले सर्व कामे करून देण्याची खात्री देतो, तुम्ही आपापसातील मतभेद ठेवु नका. खंबीरपणे एक दिलाने राहा. कार्यक्रम लहान होता तरी तुम्ही आम्हाला सर्वांना बोलावले, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. यावेळी शहर प्रमुख निलेश खोडदे, उप तालुकाप्रमुख सुनिता मुळे, शेतकरी तालुकाप्रमुख कैलास नऱ्हे, विभाग प्रमुख सुभाष ठाणगे सर, शाखाप्रमुख संतोष घनवट यांनी मनोगत व्यक्त केले.
: औटी साहेबांनी जलयुक्त शिवार योजना तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर राबवली. दरोडी पासून चोंभुत पर्यंत तीनशे मीटरवर बंधारे केली. पावसाचे पाणी अडवले दोन टीएमसी, चार टीएमसी वर बसलो नाही. आपण जनते साठी काम करायचे, जनतेचे काही देणे लागतो, कोण जाणार, येणार माहित नाही. पुढील काळात तुम्ही एकसंघ रहा सरांनी या गटात खूप मोठे काम केले: रामदास भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख)
यावेळी गणप्रमुख धनंजय निमसे, सरपंच शिवाजी निमसे, ग्राम. सदस्य भाऊ शेठ खरात, कमल दातीर, वसंत दातीर, माजी सरपंच सुनीता निमसे, नारायण पानमंद, चेअरमन तुळशीराम लगड, शिवसेना शाखाप्रमुख संतोष घनवट, शंकर मिसाळ, विकास दाते, श्याम साळवे, गोरख घनवट, सुनील लगड, आप्पा लगड, रामचंद्र खरात, नाना दातीर, अशोक नरड, बापू दाते, नामदेव दाते, गोवर्धन खरात, बापू दाते, पोपट अनंत, रामदास नरड, तुकाराम पानमंद, भिमाजी दातीर, बापू नरड, रामभाऊ निमसे, किसन खरात, रामदास दातीर, मिनीनाथ पानमंद, बाळासाहेब घनवट, बाबाजी दातीर, काशिनाथ दातीर, भाऊ दातीर, विकास दातीर, पोपट नरड, सुनंदा दातीर, आशा पानमंद, सोन्याबापु दातीर, वैभव नरड, संतोष नरड, राहुल खरात, संतोष खरात, सतीश दातीर, दिगंबर खरात, जालिंदर नरड, भाऊ पानमंद, गोकुळ निमसे, कामाचे ठेकेदार फारुख शेख, ग्रामसेविका डेरे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. प्रास्ताविक धनंजय निमसे यांनी केले सूत्रसंचालन सरपंच शिवाजी निमसे यांनी केले,तर आभार शाखाप्रमुख संतोष घनवट यांनी मानले.