महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन!

मुंबई- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबर १९५६ सालि महापरिनिर्वाण झाले या दिनानिमित्ताने लाखो आंबेडकर अनुयायी देशातून वेगवेगळ्या राज्यातून अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे एकत्र येतात
त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात ( शिवाजी पार्क) येथे अनुयायांसाठी विविध नागरी सेवा सुविधा पुरविल्या जातात दर्शवलेल्या मार्गाने मार्ग क्रमन करावे व शिस्तीचे पालन करून महामानव यांना अभिवादन करावे
बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका ने दादर येथे चैत्यभूमी तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान ( शिवाजी पार्क) परिसरात पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा सुविधा (१) अग्निशामक सेवा (२) नियंत्रण कक्ष वैद्यकीय कक्ष (३) अण्णा वाटप आणि भोजनासाठी बैठक व्यवस्था (४) धूळ रोखण्यासाठी पाय बाहेर आच्छादने व्यवस्था(५) फायबरची तात्पुरते स्नानगृह व प्रसाधन ग्रह (६) विचार प्रवर्तक पुस्तक संग्रह विविध पूर्ण स्टॉलची रचना (७) आदरांजली कार्यक्रमाच्या मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण होत आहे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ५ डिसेंबर रोजी रात्री ठीक अकरा वाजता येथे संयुक्तरित्या अभिवादन सभा व कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले
सर्व सामाजिक संस्था तसेच समाज बांधवांनी व यंत्रणांनी सन्मावयातून काम करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी दादर मुंबई येथे लाखो अनुयायी येतात त्या अनुषंगाने आपण ही येथे वेगवेगळ्या समुदायातून ५ डिसेंबर रोजी रात्री ठीक अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन म्हणून कॅन्डल मार्च काढतो मात्र यावर्षी आपण परिसरातील सर्व समाज बांधव मिळून एकत्रित कॅन्डल मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक वही एक पेन ज्यांना एक वही एक पेन शॉपनर म्हणून देण्यास शक्य असल्यास आयोजकांशी संपर्क साधावा जमलेले सर्व साहित्य परिसरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते ह्या विनम्र अभिवादन साठी आलेले अनुयायी कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी घेतात उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे