महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ना. देवेंद्र फडणवीस , ना.एकनाथ शिंदे ना.अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई दि ५ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आज आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे राज्यपाल तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली श्री फडणवीस हे: भारतीय जनता पक्षाकडून ५२-नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा-नागपूर मतदारसंघातून निवडून आले आहे
१९९२ व १९९७ सदस्य व १९९७ मध्ये महापौर, महानगरपालिका, नागपूर१९९८ मेअर इनकौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;
१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्रविधानसभा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत, असून
३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,२२ नोव्हेंबर, ते २७ नोव्हेंबर, २०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
डिसेंबर २०१९ – जून २०२२ विधानसभेचे विरोधी पक्षनेते
३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची पुन्हा निवड, झाली असून आज दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री झाले आहे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून श्री. एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांनी आज शपथ घेतली
ते : शिवसेना प क्षा कडून १४७-कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा- ठाणे मतदार संघातून निवडून आले आहे शिंदे हे: ठाणे महानगरपालिकेत १९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृहनेता,. २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९. २०१९-२०२४ मध्ये , महाराष्ट्र विधानसभा; सदस्य २०१४-२०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४
, महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केले ५ डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी
२०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार सांभाळला व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री; म्हणून काम पाहिले डिसेंबर २०१९ पासूनशिवसेनेचे गटनेते; नोव्हेंबर २०१९ – जून २०२२ नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिकउपक्रम) खात्याचे मंत्री. ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्याची फेरनिवड. झाली आणि आजदिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांनी आज शपथ घेतली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २०१-बारामती, जिल्हा-पुणे मतदारसंघातून ते निवडून आले आहेत
१७ जून, १९९१ ते १८ सप्टेंबर, १९९१ सदस्य, लोकसभा १९९१-९५ (पो.नि.), १९९५-९९,१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४- २०१९, २०१९- २०२४ या दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा सदस्य २८ जून, १९९१ ते नोव्हेंबर, १९९२ मध्ये राज्यमंत्री, नोव्हेंबर, १९९२ ते फेब्रुवारी, १९९३
मध्ये राज्यमंत्री; २७ ऑक्टोबर, १९९९ ते २५ डिसेंबर, २००३ मध्ये मंत्री; २६ डिसेंबर, २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ मध्ये मंत्री ९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९ मध्ये मंत्री; ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१० मध्ये मंत्री; ११ नोव्हेंबर, २०१० ते सप्टेंबर, २०१४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर काम केले;
२२ डिसेंबर, ते २७ डिसेंबर २०१९ उपमुख्यमंत्री, डिसेंबर २०१९ जून २०२२ उपमुख्यमंत्री; पदावर राहिले जुलै २०२३
मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड. झाली आणि आज दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ.घेतली आहे