समशेरपुर येथे कृषि विभागाचे वतीने जागतिक मृदा दिन साजरा.

अकोले/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील समशेरपुर येथे मंडळ स्तरावरील जागतिक मृदा दिवस ५ डिसेंबर रोजी साजरा केला.या मध्ये राघू पेढेकर कृषी सहाय्यक समशेरपुर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .
राजेंद्र बिंन्नर यांनी शेतकरी बांधव यांना मार्गदर्शन करताना मातीचे संवर्धन,महत्त्व आणि शाश्वत वापर याबाबत जागरूकता वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे असे सांगितले.माती ही पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे, कारण ती अन्न सुरक्षा,जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावते.मात्र, मातीची धूप,प्रदूषण,धूप यासारख्या समस्यांमुळे तिची गुणवत्ता आणि उत्पादकता कमी होत आहे. “जमिनीची काळजी घेणे: मोजमाप, निरीक्षण, व्यवस्थापित करा ही २०२४ ची थीम असणार आहे.मृदा परीक्षण अहवाल नुसार द्यावयाची खत मात्रा या विषयी माहिती दिली
.शेतकऱ्यांनी किमान तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करावे असे आव्हान राजेंद्र बिन्नर यांनी केले मृदा नमूना कसा,कधी व कोठे काढावा याची सविस्तर माहिती दिली.कृषि पर्यवेक्षक साहेबराव वायाळ यांनी १ रुपयात प्रधान मंत्री पिक विमा योजना विषयी सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकरी यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
अनिल बांबेरे कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वरील सर्व घटकांची माहिती दिली.ग्रामरोजगार सेवक रोहिदास भरितकर यांनी आभार प्रदर्शन मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समशेरपुर मंडळ कृषि अधिनस्त कृषि सहाय्यक चंद्रकांत गिर्हे,रविंद्र मांडवे,अरुण बांबेरे,नाथु शेंडे,श्रीमती ज्योती लांडगे,रुपाली भांगरे,मेघा तळपे,बचत गट समूह संसाधन व्यक्ती प्रियंका भरितकर यांचे सहकार्य लाभले.या सह कार्यक्रमासाठी दत्त कृपा महिला बचत गटातील सदस्य व शेतकरी उपस्थित होते.