सीए परीक्षेत पार्थ बरडियाचे यश!

नाशिक : नुकत्याच लागलेल्या सीएच्या परीक्षेत नाशिक येथील प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट तथा रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रफुल बरडिया यांचा मुलगा पार्थ बरडिया याने घवघवीत यश संपादन केले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मुंबईच्या गोखले आणि साठे या नामवंत सीए फर्ममध्ये आर्टिकल करताना इंटरनल ऑडिट, रिस्क अॅनालॅसिस अशा वेगवेगळ्या विषयात अनुभव घेत पार्थ याने आपले आर्टिकल पूर्ण केले. वडील सीए प्रफुल बरडिया यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे बरडिया परिवारात तो नववा सीए आहे. पार्थच्या या यशाबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक सीए प्रफुल छाजेड आणि रोटरीचे प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते पार्थ बरडिया याचा रोटरी च्या समारंभात सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
:
———