आदिवासींच्या प्रश्नांना वाच्या फोडनारा राजकारणातील एका लढवय्या नेत्याला महाराष्ट्राने गमावले.

मा. ना. मधुकररावजी पिचडसाहेब यांच्या दु: खद निधनाने अतीव दु: ख झाले. विरोधी मतांचा दखिल सन्मान करणारा, आदिवासींच्या प्रश्नांना वाच्या फोडून निकराने प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र जीवाचे रान करणारा, राजकारणातील एका लढवय्या आणि सूर्यप्रकाशी नेत्याला महाराष्ट्राने गमावले आहे. त्यांच्यातील सहृदयी महामानवा चा अनुभव मी स्वत: घेतला आहे त्याच बरोबर शैक्षणिक, सामजिक क्षेत्रातील त्या़च्या सहृयतेचाही मी अनुभव घेतला आहे. सामाजिक आणि आदिवासी अभ्यास क्षेत्रातील या संवेदनशील आणि पाहाडाप्रमाणे पाठीशी राहाणाऱ्या , पाणीप्रश्नासाठी जीवाची बाजी लावणाय्रा महाराष्ट्राच्या या उत्तुंग नेत्याला मी स्वत:,व विश्व् हिंदू परिषद बजरंग दल आणि कार्यकर्ते यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली श्रीमान आ. वैभवजी पिचड आणि त्यांच्या कुंटूंबियांना त्यांचा वारसा पुढे चालविण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🕉️शांती 🕉️
श्री शंकर गायकर
राष्ट्रीय मंत्री विश्व् हिंदू परिषद